दहावी आणि बारावीच्या परीक्षां ऑफलाईन पद्धतीनेच होणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

0
100

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी यंदाची परिक्षा ऑनलाईन घ्यावी अशी मागणी केली आहे. त्यासाठी दोन दिवसांपूर्वी राज्यातील अनेक भागात विद्यार्थ्यांनी आंदोलन देखील केले होते. मात्र यंदाचे पेपर हे ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत. विद्यार्थ्यांनी आता अभ्यासाकडे लक्ष द्यावे. असे आवाहन राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (लेखी) बुधवार 4 मार्च 2022 पासून ते बुधवार 30 मार्च 2022 पर्यंत असणार आहे. बारावीच्या परीक्षांचे संपूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी mahahsc.in या लिंकवर क्लिक करा. माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (लेखी) मंगळवार 15 मार्च 2022 पासून ते सोमवार 4 एप्रिल 2022 पर्यंत असणार आहे. बारावीच्या परीक्षांचे संपूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी mahahsc.in या लिंकवर क्लिक करा.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) साठी शालेय शिक्षण विभागामार्फत प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन तसेच लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर परीक्षा कालावधीमध्ये मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

इयत्ता बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी/अंतर्गत गुणांच्या परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च 2022 या कालावधीत आयोजित करण्यात येतील. लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल 2022 या कालावधीत होतील. तर माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान ऑनलाईन परीक्षांचा कालावधी 31 मार्च ते 9 एप्रिल 2022 असा असेल. प्रात्यक्षिक, श्रेणी/ तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व आऊट ऑफ टर्न परीक्षा 31 मार्च ते 21 एप्रिल 2022 या कालावधीत घेण्यात येतील. इयत्ता बारावीच्या परीक्षांचा निकाल अंदाजे जून 2022 च्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल.

सकाळच्या सत्रातील परीक्षा 10.30 वाजता सुरु होणार आहे. तर, मुलांना 10.20 वाजता प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे. तर, दुपारच्या सत्राची परीक्षा 2.30 वाजता सुरु होईल आणि मुलांना प्रश्नपत्रिका 2.20 वाजता देण्यात येणार आहे. अशा पद्धतीने अर्धा तासाचा वेळ विद्यार्थ्यांना वाढवून देण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here