दहावी आणि बारावीच्या पूरवणी परीक्षेचा निकाल जाहीर

0
39

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज दुपारी 1 वाजता जाहीर झाला आहे.विद्यार्थ्यांना निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर जाऊन पाहता येणार आहे

दहावी पुरवणी परीक्षेसाठी राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळांमधून एकूण 20,517 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 19,042 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 5,803 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या निकालाची टक्केवारी 30.47 आहे. एक किंवा दोन विषयात उत्तीर्ण होऊ न शकलेले विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये एटीकेटी सवलतीद्वारे 11 वीच्या प्रेवशासाठी पात्र ठरणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

बारावी पुरवणी परीक्षेसाठी राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य आणि एचएससी व्होकेशनल या शाखांतील एकूण 54,058 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी 53,547 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले. त्यापैकी फक्त 17,281 विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले असून बारावीच्या निकालाची टक्केवारी 32.27 ऐवढी आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here