मुंबई: प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री काव्या थापरला मुंबई अटक झाली आहे. मुंबईतील जुहूच्या पोलिसांनी या अभिनेत्रीवर दारुच्या नशेत कार चालवून दुसऱ्या वाहनाला धडक दिल्याचा आरोपाकाखाली अटक केली आहे.त्याचबरोबर महिला पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोपही तिच्यावर पोलिसांकडून दाखल करण्यात आला आहे.
अभिनेत्री काव्या थापरच्या अटकेनंतर तिला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. काव्या दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने तामिळ आणि तेलुगू भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय ‘तत्काल’ या शॉर्ट हिंदी चित्रपटातही तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती.


