दागिन्यांपुढे माणुसकी हरली; रत्नागिरीत तीन वृद्ध महिलांचा खून

0
60
उत्तर प्रदेशातील आरोपीला पकडण्यात वेंगुर्ला पोलिसांना यश

रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली याठिकाणी दोन दिवसांपूर्वी माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. दापोली तालुक्यातील वणोशी खोतवाडी येथे एकाच घरात तीन महिलांची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती.


नराधम आरोपींनी क्रूरतेच्या परिसीमा गाठत तिन्ही वृद्ध महिलांना भयंकर मृत्यू दिला होता. यानंतर आरोपींनी संबंधित वृद्ध महिलांचा मृतदेह जाळला होता. या हत्या मृत महिलांच्या अंगावरील दागिन्यांसाठी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. सत्यवती पाटणे (57), पार्वती पाटणे (90) आणि रुक्मिणी पाटणे (80) अशी हत्या झालेल्या वयोवृद्ध महिलांची नावं आहेत. अज्ञात चोरट्यांनी या तिघींची हत्या करून त्यांच्या अंगावरील 1 लाख 62 हजार 150 रुपयांचे दागिने जबरीने चोरून नेल्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोली तालुक्यातील वणोशी खोतवाडी येथील एकाच घरात तीन वृद्ध महिलांची हत्या करून त्यांना जाळलं होत.


दापोली पालगड रस्त्यावर असणाऱ्या वणोशी खोतवाडी या गावात केवळ 25 घरं आहेत. यातील बहुतांशी घरं बंद असून अनेकजण कामानिमित्त मुंबईत स्थलांतरित झाले आहे. त्यामुळे गावात सध्या केवळ चार ते पाच कुटुंबेच वास्तव्याला आहेत. दरम्यान ऐन संक्रातीच्या दिवशी या तिन्ही वयोवृद्ध महिलांची अज्ञाताने निर्घृण हत्या केली आहे.
दरम्यान घटनेच्या दिवशी सकाळी तिन्ही वृद्ध महिला घराबाहेर आल्या नाहीत. त्यामुळे शेजारी राहणाऱ्या इंदूबाई पाटणे यांनी आपल्या कुटुंबीयांसह संबंधित घराची पाहणी केली. यावेळी तीनही महिलांचे मृतदेह घरातील वेगवेगळ्या खोलीत आढळले. एका महिलेचा मृतदेह हा घराच्या हॉलमध्ये तर दुसरा मृतदेह हा बेडरुममध्ये आढळला. तर तिसरा मृतदेह हा किचनमध्ये भयावह स्थिती आढळला आहे. तिन्ही मृतदेहाच्या अंगावर असिड सदृश्य पदार्थ आढळला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here