प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर
दापोली- रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वनोशी खोत वाडीत मकर संक्रांतीच्या दिवशीच तीन वयोवृध्द महिलांची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली होती.
केवळ आठ दिवसातच पोलिसांनी या हत्याकांडाचा तपास लावला आहे. याप्रकरणी संशयित रामचंद्र शिंदे (वय-५३) याला पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले. रत्नागिरी व दापोली पोलिसांची ही दमदार कामगिरी केली.
वनोशी खोत वाडीतील पार्वती परबत पाटणे (वय ९०), सत्यवती परबत पाटणे (८०) व इंदूबाई शांताराम पाटणे (८०) या तीन वयोवृद्ध महिलांचे घरातच वेगवेगळ्या खोलीत मृतदेह आढळून आले होते. यानंतर हा खून की आकस्मिक मृत्यू याबाबत चर्चेला उधाण आले होते. मात्र, पोलिसांनी हा खून असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवत तपास सुरु केला होता.तर, या मृतदेहाच्या अंगावरील दीड लाखाचे दागिने गायब असल्याने दागिन्यांसाठीच या तिघींचा खून झाल्याचे पाेलीस तपासात निष्पन्न झाले होते. यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांना जाळण्याचा प्रयत्न झाल्याचा पाेलिसांना अंदाज व्यक्त केला होता. अखेर याप्रकरणाचा पोलिसांनी छडा लावत संशयित आरोपीस ताब्यात घेतले आहे.


