प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर
दोभोल वासियांना विजेच्या लपंडावाला वारंवार समस्या उदभवत होत्या.अनेक मान्यवरांनी समस्या सोडवण्याचा प्रयत्नही केला पण म.रा.वि.वि मंडळ दाद देत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते नरेश बोवलेकर व ग्रामस्थांनीआंदोलन छेडण्याचे सविस्तर वृत्त दैनिक सिंधुदुर्ग समाचार मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर वेंगुर्ला म.रा.वि.वि.मंडळाचे उपमुख्य,कार्यकारी अधिकारी, वेंगुर्ला, यांनी दोन दिवसात लाईनमन देण्याचे केले मान्य केले.
तसेच लाईन वरील झाड़ी कटींग, काही मुख्य ठीकाणचे सडलेल्या पोलांची डागडुजी करण्याची ग्वाही दिली आहे. दोभोली वायरमन महिनाभर रजेवर राहिल्याने दाभोलवासियांना प्रभारी वायरमन देण्यात आला होता. पण प्रभारी वायरमन दोन्ही गावांचे काम पेलू न शकल्याने दोभोल वासियांना विजेच्या लपंडावाला वारंवार समस्या उदभवत होत्या.सामाजिक कार्यकर्ते नरेश बोवलेकर व ग्रामस्थांनी आपल्या स्टाईलने आंदोलन छेडण्याचे संकेत दिल्याने दोन दिवसात दोभोलवासीयांना वायरमन देवून दोभोलवासियांच्या विजेचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.


