मुंबई- दिग्दर्शक महेश मांजरेकरांचा आगामी ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता.या चित्रपटाची प्रोमोमध्ये गिरणी कामगार आणि त्यांच्या मुलांविषयीची दृष्यांवर काही घटकांनी आक्षेप घेतला. या ट्रेलरमध्ये दाखण्यात आलेल्या दृष्यांमुळे महिला आयोगाने या चित्रपटाविरोधात तक्रार नोंदवली होती. त्यामुळे सध्या हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
आता या सर्व वादावर महेश मांजरेकांनी प्रतिक्रिया देत सर्व आक्षेपार्ह दृष्ये ट्रेलर आणि चित्रपटातून वगळण्यात आल्याचे त्यांनी सांगत एक निवेदन जाहिर केले आहे.त्यात वरील प्रसिद्ध झालेला ट्रेलर सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन हटवण्यात आला असून नवीन प्रोमो ट्रेलर प्रसिद्ध करण्यात आला असल्याचे सांगत त्यांनी कोणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतू नव्हता. समाजातून उमटणाऱ्या भावनांचा मान राखला आहे असेही सांगितले.