दिल्ली:देशभरातील कोरोना संक्रमितांमध्ये वाढ होत आहे. दिल्लीत कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असताना दिसत आहे. त्यातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी ट्वीट करून स्वतःला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन केले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी देखील कोरोना टेस्ट करून होम क्वारंटाईन व्हावे, असा सल्ला त्यांनी दिला आहे
बिहार पाटणा येथे कोरोनाचा कहर झाला आहे. येथील एकूण 168 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे .याशिवाय , माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. दिवसाकाठी 300 हून जास्त नवे रुग्ण समोर येत आहेत.पाटणा शहरात सर्वाधिक रुग्ण सापडले असून जिल्ह्यात 218 रुग्ण आढळून आले आहेत अशी माहिती सिव्हील सर्जननि दिली आहे.आज मुख्यमंत्री नीतीश कुमार आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांसोबत वाढत्या कोरोनाबाबत महत्त्वपूर्ण बैठक करणार आहेत


