दिल्लीमध्ये लॉकडाऊन एक आठवड्यासाठी वाढवण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज दिली आहे. दिल्लीत कोरोनाच्या रुग्नांना बेड,औषधे,ऑक्सिजन मिळणे दुरापस्त झाले आहे. अशा परिस्थितीत संक्रमणाच्या विरोधात लॉकडाऊन हे अखेरचे हत्यार आहे असे त्यांनी हा लॉकडाऊन वाढविताना म्हंटले आहे .दिल्लीमध्ये लॉकडाऊन 26 एप्रिल सकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार होते. परंतु अद्याप संसर्ग कमी झालेला नाही.
लॉकडाऊन दरम्यान संक्रमणाचे प्रमाण 36-37% पर्यंत पोहोचले. ते 1-2 दिवसात कमी झाले आहे आणि 30 वर आले आहे.दिल्लीला दररोजची ऑक्सिजनची गरज 700 मीट्रिक टन आहे. सर्वांशी चर्चा करूनच लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे हा लॉकडाऊन पुढच्या सोमवारी सकाळी 5 वाजेपर्यंत पर्यंत असणार आहे.