दिल्लीत मुसळधार; रेड अलर्ट जारी

0
109

हवामान विभागाने दिल्लीत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.दिल्लीत शुक्रवारी रात्री सुरू झालेल्या पावसामुळे दक्षिण दिल्लीच्या अनेक भागात रस्ते जलमय झाले असून येथून ये -जा करणाऱ्या लोकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पावसामुळे बहादूरगढ, गुरुग्राम, लोनी देहात, हिंडन एअर फोर्स स्टेशन, गाझियाबाद, इंदिरापुरम, छपराउला, चरखी दादरी, मट्टनहेल, झझार, सोनीपत, रोहतक, मोदीनगर, हापूर, दिल्ली एनसीआर. बागपत भागां लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

ढगांचा गडगडाट आणि आकाशात चमकणाऱ्या विजा अशा वातावरणातच दिल्लीकर शनिवारी सकाळी जागे झाले. वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, पहाटे साडेपाच ते दुपारी अडीच या वेळेत शहरात ११७.९ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. या महिन्याच्या सुरुवातीला १ सप्टेंबरला ११२.१ मिमी व २ सप्टेंबरला ११.७ मिमी पावसाची नोंद शहरात झाली होती. ४६ वर्षांनी इथे एवढा पाऊस झाला आहे. 

दिल्ली विमानतळ परिसरात पाणी साचल्यामुळे स्पाइसजेटची दोन आणि इंडिगो व गो फस्र्टचे एक अशी ४ देशांतर्गत विमाने जयपूरला वळवण्यात आली; तर दुबईहून दिल्लीला येणारे एमिरेट्स कंपनीचे विमान अहमदाबादकडे वळवण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली. तथापि, या परिसरात पाणी काही वेळच तुंबले. सकाळी ९ वाजेपासून येथून विमान वाहतूक सुरू झाली, असे दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लि. (डीआयएएल)ने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here