दिल्ली, महाराष्ट्र आणि यूपीमधून 6 दहशतवाद्यांना अटक

0
89

दिल्ली पोलिसांनी 6 संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. देशातील अनेक ठिकाणी हे दहशतवादी हल्ले करण्याची योजना आखत होते.येत्या सणांदरम्यान देशात स्फोट घडवून आणण्याचा पाकिस्तानी कटाचा पर्दाफाश झाला आहे. नवरात्री आणि रामलीला दरम्यान सीरियल ब्लास्ट करायचा होता असा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. त्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि उच्च दर्जाची शस्त्रे जप्त केली आहेत. दिल्ली पोलिसांनुसार अटक करण्यात आलेल्या 6 पैकी 2 जणांनी पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI कडून प्रशिक्षण घेतले आहे.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने यूपी एटीएससह प्रयागराजवर छापा टाकून या सर्वांना पकडले आहे. प्रयागराजच्या करेलीमध्ये हे लोक उपस्थित होते. दिल्ली पोलिसांनुसार हे सर्वजण देशात दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचत होते. तसेच अनेक प्रसिद्ध व्यक्तींना देखील लक्ष्य केले जाणार होते. देशातील वातावरण खराब कराण्याचा त्यांचा उद्देश होता.सीमेपलीकडून शस्त्रे आणून वेगवेगळ्या राज्यांमध्ये पाठवणे हे दहशतवाद्यांच्या या टीमचे काम होते.शस्त्र आणणाऱ्या टीमला पाठिंबा देण्यासाठी दुसऱ्या टीमला हवालाद्वारे पैसे आणून दहशतवाद्यांना पाठवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. उर्वरित दहशतवाद्यांसाठी आधार यंत्रणा तयार करण्याची जबाबदारी या टीमवर होती.

दहशतवाद्यांची नावे मोहम्मद अबू बकर, जान मोहम्मद शेख, मोहम्मद अमीर जावेद,मूलचंद लाला ओसामा आणि जीशान कमर अशी आहेत.यातील दोन दहशतवादी ओसामा आणि जीशान कमर पाकिस्तानातून प्रशिक्षित आहेत आणि त्यांना तेथून येथे पाठवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here