कोरोनाचे रुग्ण देशभर वाढत आहेत. त्यातच त्यावरील अत्यावश्यक उपचारात चालेले राजकारण ,ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्ली हायकोर्टाने केंद्रसरकारला चांगलेच फटकारले आहे. ‘ डॉक्टरांवर कोरोना रूग्णांना देण्यात येणारी ऑक्सिजन कमी करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचे ऐकले आहे. कारखाने ऑक्सिजन पुरवठ्यासाठी प्रतीक्षा करु शकतात, मात्र कोरोना रुग्ण करु शकत नाही. सध्या मानवी जीवन धोक्यात आले आहे. अशा कडक शब्दात केंद्राला कोर्टाने फटकारले आहे.