दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीला देखील हेल्मेट सक्ती

0
57

मुंबई -मुंबई वाहतूक पोलिसांनी मुंबईकरांना नवा आदेश काढला आहे. या आदेशानुसार, दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीला देखील हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे. याबाबत मुंबई वाहतूक शाखेने तसे आदेश काढत मुंबईकरांना 15 दिवसांचा कालावधी दिला आहे.

विना हेल्मेट दुचाकी चालवणे कायद्याने गुन्हा असून कायद्यानुसार 500 रुपये दंड तसेच वाहतूक परवाना तीन महिन्यासाठी निलंबित करण्याची तरतूद आहे. त्यानुसार आता दुचाकी धारकांना नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.नियमानुसार दुचाकी स्वराच्या मागे बसणाऱ्या व्यक्तीला देखील हेल्मेट घालणे सक्तीचे करण्यात आले आहे.वाहतूक नियम न पाळणाऱ्यांमुळे लहान मोठे अपघात होतात. या अपघातात हेल्मट न घातल्यामुळे डोक्याला मार लागून कित्येकांना आपला जीव देखील गमवावा लागला असल्याने हेल्मट सक्तीचा नवीन नियम दुचाकीस्वारांना बंधनकारक करण्यात आला आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना 500 रुपये दंड तसेच 3 महिने लायसन्स रद्द केले जाणार आहे. त्यामुळे आता मोटारसायकलवर जाताना चालक आणि मागे बसलेल्या व्यक्तीला हेल्मेट बंधनकारक असणार आहे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here