शिरगाव: शिरगाव शेवरीच्या कोरोना कृती सनियंत्रण समितीचा राजीनामा दिला आहे. देवगड पोलीस ठाण्यामधून संचारबंदी उल्लंघन केल्याप्रकरणी ११८ जणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये जे नागरिक विनामास्क रस्त्यावर फिरत होते अशा लोकांवर कारवाई करण्यात आली. तसेच कोरोना काळात घालून दिलेले निर्बंध ज्या दुकानदारांनी पाळले नाहीत अशा दुकानदारांवरही कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणी पी.एस.आय कांबळे.एस.सी.पडवळ, पोलीस नाईक जाधव,परब,पोलीस कॉन्स्टेबल पाटील,होमगार्ड झारी यांनी हि कारवाई केली. पोलीस कारवाईचे काम दुपारी ३ वाजेपर्यंत चालू होते. त्याशिवाय कोकणात वाढत असलेला कोरोनाचा संसर्ग पाहता नागरिकांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे अशीही विनंती नागरिकांना केली.