भारत सरकारशी साधलेल्या संवादात ऑटोमोटिव्ह टायर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (एटीएमए) असे म्हटले आहे, की ऑटोमोटिव्ह टायर्स त्या क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहे, जिथे देशांतर्गत उत्पादन क्षमतेमुळे आयात अनावश्यक आहे. सरकारने या उद्योगाला भारताची कोणत्या क्षेत्रात स्वयंपूर्ण बनण्याची क्षमता आहे असे विचारले होते. त्यानुसार आगामी एफटीए तयार केला जाणार असून देशांतर्गत उद्योगाचे हित जपणे शक्य होईल.https://sindhudurgsamachar.in/१२-वर्षाखालील-मुलांची-ड/
एटीएमएनुसार भारतातील देशांतर्गत टायर उद्योग जगात सर्वात मोठा असून या क्षेत्राचे वार्षिक उत्पादन २०० दशलक्ष युनिट्सपेक्षा जास्त आहे. त्यामध्ये दुचाकी, प्रवासी वाहने, व्यावसायिक वाहने आणि ऑफ- रोड वाहने अशा विविध विभागांसाठी केल्या जाणाऱ्या उत्पादनाचा समावेश होतो. पुरेशी उत्पादनक्षमता असून आर्थिक वर्ष २४ च्या पहिल्या तिमाहीत २००० कोटी रुपये टायर्स आयात केले गेले. हे प्रमाण त्याआधीच्या वर्षात याच कालावधीत केलेल्या आयातीपेक्षा २७ टक्क्यांनी जास्त आहे.
‘गेल्या काही वर्षांत टायर क्षेत्रात लक्षणीय गुंतवणूक करण्यात आली असून आघाडीच्या उत्पादकांनी तब्बल ३५,००० कोटी रुपये क्षमता विकास, अद्ययावत तंत्रज्ञान आणि संशोधन व विकासासाठी गुंतवले आहेत. नवीन क्षमता कार्यान्वित होत असताना टायर्सची आयात करण्यापेक्षा देशांतर्गत उत्पादनाची गरज पूर्ण करणे महत्त्वाचे आहे,’ असे एटीएमएचे अध्यक्ष श्री. अर्णब बॅनर्जी यांनी सांगितले.
देशांतर्गत टायर उद्योगात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती केली जाते. या उद्योगातर्फे ५००,००० लोकांना उत्पादन, वितरण आणि संबंधित सेवा क्षेत्रात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार पुरवला जातो. टायर्सच्या देशांतर्गत उत्पादनाला प्राधान्य देणेही आवश्यक आहे, कारण देशातील १० लाख रबर उत्पादकांचे अर्थार्जन टायर उद्योगावर अवलंबून आहे तसेच देशांतर्गत एनआरमध्ये टायर उद्योगाचा वाटा ७० टक्के आहे.
भारतीय टायर उद्योग आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि डिजिटायझेशनसारख्या संकल्पनांमुळे स्थित्यंतरातून जात असून पर्यायाने या क्षेत्राच्या काम करण्याच्या पद्धतीत व्यापक बदल घडून येत आहेत.भारतीय टायर उद्योग हा वेगवेगळ्या बाबतीत जागतिक पातळीवर वेगाने सुसंगत होत आहे. भारतातील प्रमुख कंपन्यांद्वारे संशोधन आणि विकासासाठी केली जाणारी गुंतवणूक वाढली असून ती गेल्या काही वर्षांपूर्वीच्या ०.५-०.६ टक्क्यांवरून सध्या १.५ टक्क्यांवर गेली आहे.
आज हे क्षेत्र देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय वाहन ओईएम्सच्या डिझाइन, विकास इत्यादीशी संबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी सज्ज आहे. त्याशिवाय देशात तयार होणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी आवश्यक टायर्सचे उत्पादन होईल याची खात्रीही या उद्योतर्फे केली जात आहे. सर्व प्रकारच्या टायर्सच्या उत्पादना हे क्षेत्र मागणीच्या पुढे आहे. वाहन तयार झाल्यानंतर लगेचच टायर कंपन्या फिटमेंट्ससह सज्ज असतात. त्यामुळे ओईएम टायर्सची आयात करत नाहीत आणि देशांतर्गत टायर उद्योगातर्फे गरजा पूर्ण केल्या जातात असे श्री. बॅनर्जी म्हणाले.
सध्या टायर उत्पादक कमी उत्सर्जन करणाऱ्या, वजनास हलक्या, चांगली इंधन कार्यक्षमता आणि रोलिंगसाठी कमी सहकार्य लागणाऱ्या टायर्सच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संशोधनाच्या मदतीने उत्पादन यंत्रणेमध्ये आवश्यक बदल करत आहेत.देशांतर्गत उत्पादनाला चालना देत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भारताला टायर उद्योगातील आपले आघाडीचे स्थान कायम राखता येईल. त्याचप्रमाणे रोजगार निर्मिती, शाश्वतता आणि आर्थिक विकासाला चालना देता येईल.