चंद्रपूर- देशातील पहिले 105 मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेचे तरंगते सौर ऊर्जा पार्क महाराष्ट्रात उभे राहणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील इराई धरणात महानिर्मितीने हे सोलर पार्क उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 580 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून पुढील 15 महिन्यांत सौर प्रकल्प उभारणीचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.