बिहार- बिहार मधील कोसी नदीवर बांधल्या जात असलेल्या देशातील सर्वात लांब बाळ पुलाचा काही भाग कोसळल्याने एका मजुराचा मृत्यू झाला आहे. याठिकाणी आणखी पंधरा ते वीस कामगार जखमी झाले असून घटनास्थळी पोलीस पोहोचले आहेत. या ठिकाणी युद्ध पातळीवर बचाव कार्यासाठी सुरुवात केली असून आणखी 30 मजूर गाडले गेले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बिहार मधील सुपौल येथे बांधकाम सुरू असलेल्या पुलाचे 50, 51 आणि 52 क्रमांकाचे खांब कोसळल्याने त्यावरील तीन स्लॅब पडल्याने ही दुर्घटना घडली आहे. https://sindhudurgsamachar.in/देश-विदेश-मुख्यमंत्रीपद/
बिहार मधील मधुबनी आणि सुपौल दरम्यान बकौर पूल बांधला जात आहे. हा पूल भारतमाला प्रकल्प अंतर्गत बांधला जात असून पुलासाठी 171 खांब उभारले जात आहेत. यापैकी 150 हून जास्त खांब उभारण्यात आले आहेत. या पुलाचे एकूण लांबी 10.5 किलोमीटर असून बाराशे कोटी रुपये खर्च होणार आहे. या महत्त्वाकांक्षी पुलामुळे सुपोल आणि मधुबनी मधील अंतर 100 किलोमीटरने कमी होणार आहे. परंतु आता या अपघातामुळे पुलाच्या बांधकामास खिळ बसली आहे.