दिल्ली – काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात प्रकृती अस्वास्थ्यामुळे दाखल करण्यात आले आहे. सोनियाजींना ताप व छातीतील संसर्गामुळे तातडीने दिल्ली स्थित सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात असून रुग्णालयात त्यांच्या वेगवेगळ्या तपासण्या करण्यात आल्या. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-काजू-प्रक्रिया-उद्योजका/
सोनिया गांधी यांची प्रकृती जानेवारीतही बिघडली होती. भारत जोडो यात्रेनंतर आपण राजकारणातून निवृत होऊ असे सूचक विधान त्यांनी केले होते.सर्व कार्यकर्ते यांनी १९९८ पासून खूप चांगली साथ दिली असल्याचेही त्यांनी सांगितले होते
सध्या राहुल गांधी ब्रिटन दौऱ्यावर आहेत. राहुल केम्ब्रिज विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असून विद्यापीठातील विद्यार्थ्यांना व्याख्यान देण्यासाठी ब्रिटनला गेले आहेत. या विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद आज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.राहुल यांच्या वक्तवव्यावर विरोधकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.


