देश-विदेश: कोलकाता बनावट शिक्षक भरतीतील भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ एसएससी गुणवत्ता यादीतील वंचित उमेदवार ५९१ दिवस संपावर!

1
172

पश्चिम बंगाल – कोलकाता येथील बनावट शिक्षक भरतीतील भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ एसएससी गुणवत्ता यादीतील वंचित उमेदवार ५९१ दिवस संपावर गेले आहेत. 2016 मध्ये शाळा सेवा आयोगाने पश्चिम बंगाल- कोलकाता येथे नववी आणि बारावी स्तराच्या शिक्षक भरतीची परीक्षा घेतली होती. यावेळी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली नाही.या उमेदवारांची एसएमएसद्वारे बेकायदेशीर भरती करण्यात आली होती. भरतीवेळी 1:1.4 च्या प्रमाणात राजपत्राचे उल्लंघन झाले म्हणून शिक्षक भरतीतील भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ, गुणवत्ता यादीपासून वंचित राहिलेल्या उमेदवारांनी 2019 मध्ये कोलकाता प्रेस क्लबसमोर 29 दिवस उपोषण सुरू ठेवले होते. या भरतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची माहिती मिळाल्यावर पश्चिम बंगालचे माननीय मुख्यमंत्री यांनी गुणवत्ता यादीतील सर्व वंचित उमेदवारांना भरती करण्याचे आश्वासन दिले होते. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सिंधुदुर्ग-जिल्ह्यात-ध/

परंतु गुणवत्ता यादीतील सर्व वंचित उमेदवारांना भरती करण्याच्या आश्वासनाची अंमलबजावणी न झाल्यामुळे, 2021 मध्ये, उच्च न्यायालयाच्या परवानगीने, सॉल्ट लेक सेंट्रल पार्क गेट नं.जवळ पुन्हा 187 दिवसांचे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला जरी भरतीचे आश्वासन मिळाले असले तरी त्या आश्वासनाची अंमलबजावणी अद्यापही झाली नाही. त्यामुळे या उमेदवारांनी 8 ऑक्टोबर 2021 पासून गांधी पुतळ्यासमोर अनिश्चित काळासाठी पुन्हा धरणे सुरू केले. ही चळवळ तीन कालखंडातील 591 दिवसांमध्ये झाली असली आणि एकूण 8000 पेक्षा अधिक बनावट भरती उघडकीस आली असली तरी आजवर वंचित उमेदवारांना अजूनही न्याय मिळालेला नाही. नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या एका वर्गाला असे वाटते की, शुभम बिस्वाससारख्या नोकरीच्या दलालांच्या संपर्कात असलेल्या उमेदवारांची चौकशी केल्यास भ्रष्टाचाराच्या मुळाशी जाता येईल आणि गुन्हेगारांना त्यामुळे शिक्षा होऊ शकेल.

“गुणवत्ता यादीपासून वंचित असलेले नोकरी शोधणारे आम्हा उमेदवारांना आशा आहे की गुणवत्ता यादीत समाविष्ट असलेल्या सर्व वंचित नोकरी शोधकांना माननीय उच्च न्यायालय आणि मानवतावादी सरकारच्या देखरेखीखाली लवकरच नियुक्ती पत्र मिळेल. सरकारने सर्व वंचित नोकरी शोधणार्‍यांसाठी सुमारे 15000 सुपर न्युमरिकल पदे निर्माण केली आहेत. माननीय उच्च न्यायालयाच्या मध्यस्थीने व शासनाच्या सदिच्छेने सर्व वंचितांना लवकरात लवकर नियुक्ती देऊन न्याय मिळेल,” असा विश्वास या उमेदवारांनी व्यक्त केला आहे .

शिक्षक भरतीमध्ये ज्या प्रकारे दलाली सुरू आहे, त्याचे पुरावे मिळाले आहेत. फॉर्म भरताना व्यक्तीचा फोन नंबर आणि व्हॉट्सअॅप पोचपावती क्रमांक एकच आहे (8348801899). मा.उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली 8000 बनावट नोकर्‍या पकडल्या गेल्या आहेत. या उमेदवारांनी व्हाट्स आप मेसेज असलेले फोटोही सादर केले आहेत. वरील चित्रासह गुणवत्ता यादीतील सदस्यांच्या मुद्द्यावर प्रकाश टाकावा अशी मागणी सदर उमेदवारांनी शासनाकडे केली आहे.

1 COMMENT

  1. […] महाराष्ट्र विधानसभेचे सभापती आमदार राहुल नार्वेकर हे ६ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा भेटीसाठी येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत ते संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेणार आहेत. जिल्ह्यातील नावाजलेल्या संस्था व प्रकल्पाची माहितीही ते यावेळी जाणून घेणार आहेत. भारतीय जनता पार्टी ही अधिक लोकभिमुख व्हावी, मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील सामान्य जनतेचा विकास विविध योजनांमधून तळागाळात पोहोचला पाहिजे यादृष्टीने ते मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या दौऱ्याचे अधिकृत सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर होईल, अशी माहिती भाजपा सोशल मीडिया रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा संयोजक तथा महाराष्ट्र प्रदेश सदस्य अविनाश पराडकर यांनी दिली आहे.http://sindhudurgsamachar.in/देश-विदेश-कोलकाता-बनावट-श/ […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here