देश-विदेश: गगनयान मोहीमेसाठी भारताने निवडले चार अंतराळवीर, पंतप्रधानांकडून नावाची घोषणा केली जाणार

0
29
गगनयान,
गगनयान मोहीमेसाठी भारताने निवडले चार अंतराळवीर

मुबंई- भारताकडून अंतराळात व्यक्तीला पाठवण्याची तयारी केली जात आहे. अशातच इस्रोकडून (ISRO) गगनयान मोहीमेच्या माध्यमातून अंतराळात अंतराळवीरांना पाठवले जाणार आहे. याबद्दलची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ष 2018 मध्ये केली होती. यानंतर अशी चर्चा सुरू झाली होती की, कोणत्या अंतराळवीरांना अंतराळात पाठवले जाणार आहे. आज (27 फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अंतराळवीरांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-लिडकॉमच्या-उद्योजकता-प/

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार प्रशांत नायर, अंगद प्रताप, अजीत कृष्णन आणि चौहान यांना अंतराळात पाठवण्यासाठी निवडण्यात आले आहे. हे सर्वजण भारतीय वायू सैन्यातील विंग कमांडर किंवा ग्रुप कॅप्टनमधील आहेत. या सर्वांना बंगळुरु येथील एस्ट्रोनॉट ट्रेनिंग केंद्रात ट्रेनिंग देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिरुवनंतपुरम येथील इस्रोच्या विक्रम साराभाई अंतराळ केंद्राला भेट देणार आहेत. या ठिकाणी एका कार्यक्रमात चारही अंतराळवीरांची ओळख जगाला करून देणार आहेत.

गगनयान मोहीम नक्की काय आहे?

गगनयान मोहीम इस्रोची पहिली अशी मोहीम आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला अंतराळात पाठवले जाणार आहे. अंतराळवीरांना 400 किलोमीटर उंचीवर असणाऱ्या अंतराळाच्या कक्षेत पाठवले जाणार आहे. अंतराळवीर तीन दिवस अंतराळात राहणार असून त्यानंतर जमिनीवर परतणार आहेत. अंतराळ यानाचे लँडिंग समुद्रात केले जाणार आहे. यासाठी इस्रोकडून व्यक्तीला अंतराळ पाठवण्यासाठी सक्षम असणारे रॉकेट, लाइफ सपोर्ट सिस्टिमसह अन्य खास तयारी केली जात आहे. याआधी अंतराळात व्यक्तीला पाठवण्याची मोहीम अमेरिका, रशिया आणि चीनने यशस्वीपणे पार पाडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here