देश-विदेश: ‘गरिबी’वर पडदा! PM मोदींच्या दौऱ्यात दिसणारी गरिबांची घरं कपड्यानंं झाकली; यंत्रणेचा असंवेदनशील प्रताप

0
45
PM मोदीं
'गरिबी'वर पडदा! PM मोदींच्या दौऱ्यात दिसणारी गरिबांची घरं कपड्यानंं झाकली; यंत्रणेचा असंवेदनशील प्रताप

नाशिक : देशातील चार कोटी कुटूंबाना घरकुल उपलब्ध करून दिल्याचा दावा भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून केला जात असताना शुक्रवारी (दि. १२) मोदींच्या काळाराम मंदिराच्या दर्शनाआड येणाऱ्या गरिबांची घरे चक्क पांढऱ्या कपड्याने झाकल्याचे समोर आले आहे. मंदिराजवळ राहणाऱ्या गरिबांचे दर्शन मोदींना होऊ नये यासाठी यंत्रणांनी मंदिराजवळ चाळीत राहणाऱ्या लोकांची घरे झाकून त्यांना बंदिस्त केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिककरांना मोदी दिसावेत यासाठी त्यांच्या रोड शोसह सभेवर कोट्यवधीची उधळण केली असताना, दुसऱ्या बाजूला ‘मोदींना गरिबी आणि गरिबांनी मोदी’ दिसू नये यासाठी यंत्रणांनी लढवलेली शक्कल गरीबांवर अन्याय करणारी असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-चिपळूणपासून-बांद्यापर्/

पंतप्रधान मोदींच्या ताफ्यादरम्यान येणाऱ्या घरांवर पांढरे कापड
२७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाटी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी नाशिकमध्ये आले होते. या उद्घाटनासह मोदींनी रोड शो करीत, श्री काळाराम मंदिराचेही दर्शन आणि गोदाकाठाची पाहणी केली. मोदींच्या या चार तासांच्या दौऱ्यासाठी केंद्र व राज्य सरकारसह महापालिकेच्या यंत्रणेने कोट्यवधीची उधळपट्टी केली. मोदींच्या दौऱ्यात कोणतीही कमतरता भासू नये यासाठी नाशिकला सजविण्याचे फर्मानच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काढले होते. गेल्या आठ दिवसांपासून यंत्रणांनी यासाठीची खबरदारी घेतली. परंतु, या दौऱ्यात प्रशासकीय यंत्रणेने केलेली एक चूक मोदींच्या पूर्ण दौऱ्यावर पाणी फेरून गेली आहे. काळाराम मंदिरात दर्शन करण्यासाठी जाताना मोदींच्या ताफ्याच्या रस्त्यावर ही पडकी घरे येत असल्याने मोदींना ही घरे दिसू नयेत यासाठी पडक्या घरांवर पांढरे कापड टाकण्यात आले. मोदींचा दौरा होईपर्यंत जवळपास दीड तास या नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे मोदींचा दौरा होईपर्यंत या नागरिकांना घरातच बंदिस्त रहावे लागले. गरीबी निर्मूलनाची भाषा करणाऱ्या मोदींनाच गरीबांसह त्यांच्या झोपड्यांचे दर्शन होऊ नये यासाठी यंत्रणांनी लढवलेली शक्कल चर्चेचा विषय बनली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here