आज गुड फ्रायडे ! ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र सण. जगाला प्रेम, शांती आणि मानवतेचा संदेश देणारे प्रभू येशू यांचा बलिदान दिवस म्हणजे ‘गुड फ्रायडे’. हा शोक दिवस असल्याने या दिवशी कोणतेही आनंददायी कार्यक्रम आयोजित केले जात नाहीत. ख्रिश्चन बांधव या दिवशी चर्चमध्ये जाऊन प्रार्थना तसेच येशूने दिलेल्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. https://sindhudurgsamachar.in/पीएम-किसान-योजनेचा-सावळा/
बायबलनुसार, येशू ख्रिस्त हे प्रत्यक्ष देवाचे पुत्र होते. अज्ञान दूर करण्यासाठी आणि प्रेम आणि चांगुलपणा शिकवण्यासाठी ते या पृथ्वीवर आले. मात्र, त्यावेळी समाजात पाखंडी धर्मगुरूंचा प्रभाव वाढला होता. त्यापैकी काही कट्टरपंथी लोकांनी येशू ख्रिस्तांचा विरोध केला. रोमन गव्हर्नर पितालुसकडे येशू ख्रिस्तांबद्दल तक्रार केली. यहुदी लोकांनी क्रांती करू नये आणि त्यांचा रोष ओढवू नये, यासाठी गव्हर्नरने येशू ख्रिस्तांना क्रॉसवर लटकवून जीवे मारण्याचा आदेश दिला. त्यानुसार येशू ख्रिस्तांवर अमानुष शारीरिक अत्याचार करण्यात आले. तरीही येशू यांनी देवाला प्रार्थना केली की यांना माफ करा, कारण, यांना नाही माहीत की हे काय करत आहेत…
ज्या दिवशी त्यांना क्रॉसवर लटकवण्यात आले होते, त्या दिवशी फ्रायडे म्हणजेच शुक्रवारचा दिवस होता. प्रभू येशू यांची महानता, त्यांनी जगाला दिलेला त्याग, दया आणि प्रेमाचा संदेश आणि दिलेले बलिदान यामुळेच या शुक्रवारला ‘गुड फ्रायडे’ म्हटलं जाऊ लागलं.