नवी दिल्ली– चांद्रयान 3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर, भारत आता महासागरात आपल्या मोहिमेची तयारी करत आहे. समुद्रयान प्रकल्पासाठी सबमर्सिबलच्या साहाय्याने मानवाला समुद्राच्या आत 6000 मीटर तळाशी नेण्याची तयारी सुरू आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-आजी-आजोबा-दिवस-साजरानात/
या मोहिमेच्या यशामुळे सागरी संपत्तीची पाहणी करण्याची संधी तर मिळणार आहेच, शिवाय सागरी पर्यटनालाही मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी ही माहिती दिली असून त्यांनी सोशल मीडिया वर या संबंधित पोस्ट केली आहे.
‘समुद्रयान मिशन’
या मोहिमेला ‘समुद्रयान मिशन’ असे नाव देण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या सबमर्सिबलमध्ये लोकांना समुद्रात खोलवर नेले जाईल त्याच्या तपासणीचे काम 2024 मध्ये पूर्ण होईल.
2024 पर्यंत पूर्ण होईल पाणबुडीचे काम मिळालेल्या माहितीनुसार, ही पाणबुडी टायटॅनियम मिश्र धातुपासून बनवली जात आहे. ज्यामध्ये 3 लोक बसू शकतील. सेन्सर बसवलेली ही अत्याधुनिक पाणबुडी असेल जी समुद्राच्या तळातून उठणाऱ्या भूकंपाच्या लाटा शोधण्यात सक्षम असेल. याचा संपूर्ण प्रवास 12 कॅमेऱ्यांच्या मदतीने रेकॉर्ड केला जाणार आहे. ‘मत्स्या 6000’ या सबमर्सिबलची पूर्ण तयारी आणि चाचणी करण्याचे काम 2024 पर्यंत पूर्ण होईल, असे सांगण्यात येत आहे. 2026 मध्ये ते समुद्राच्या खोलवर उतरवले जाईल.