भारताने नागरिकांना दिला इशारा
वृतसंस्था– आधी युक्रेन-रशिया युद्ध, त्यानंतर हमासमुळे गाझापट्टीत सुरू झालेले इस्रायलचे हल्ले त्यामुळे जगभरात अनिश्चिततेचे वातावरण तयार झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा जगावर युद्धाचे सावट घोंगावत असल्याचे समोर आले आहे. इराण पुढच्या ४८ तासांत इस्रायलवर हल्ला करू शकते, अशी शक्यता वॉल स्ट्रिट जर्नलने व्यक्त केली आहे. इराणमधील नेत्यांच्या सूत्राच्या हवाल्याने वॉल स्ट्रिट जर्नलने दिली आहे.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-नगरपरिषदेच्या-फलकावर-म/
भारतीय परराष्ट्र खात्याने दिले महत्त्वाचे आदेश
इराण आणि इस्रायल दरम्यान तणाव निर्माण झाल्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एक महत्त्वाची सूचना दिली आहे. भारतीय नागरिकांनी पुढचे आदेश येईपर्यंत इराण किंवा इस्रायलमध्ये प्रवास करू नये, असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे. तसेच सध्या या दोन देशांत जे भारतीय नागरिक राहत आहेत, त्यांनी तात्काळ तिथल्या भारतीय दूतावासाशी संपर्क साधून स्वतःची नोंदणी करावी, असेही निर्देश दिले आहेत.