मुंबई: भारतातील मोठ्या शहरांतून फिरताना उंच आणि वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेने सजवलेल्या इमारती मोठ्या प्रमाणावर नजरेस पडत आहेत. डिझाइन आणि इंजिनियरिंगचा कस लावून इमारतींची दर्शनी बाजू (FAÇADE) सजवली जात आहे. या दर्शनी बाजूच्या माध्यमातून इमारतीचे इंटेरियर बाहेरच्या जगापासून वेगळे ठेवण्याचा आणि त्याचवेळेस ही बाजू आणखी आकर्षक करण्याचा ट्रेंड आला आहे. अलीकडच्या काळात ही दर्शनी बाजू केवळ आकर्षकतेसाठीच नव्हे, तर इतरही विविध कारणांमुळे सजवली जात आहे. https://sindhudurgsamachar.in/देश-विदेश-महानगरांच्या-त/
गेल्या दहा वर्षांत इमारतीची दर्शनी बाजू सजवण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आणि पद्धती यांच्यात मोठा बदल झाला आहे. इमारत सजवण्यासाठी अलीकडे काच, लाकूड, कंपोझिट पॉलीमर्स, ड्राय क्लॅडिंग सिस्टीम, सौर स्क्रीन्स, अल्युमिनियम, टायटॅनियम आणि झिंक यांचा वापर केला जात आहे. त्यातून इंटिग्रेटेड बिल्डिंग सिस्टीम्स तयार केल्या जातात, ज्या भोवतालच्या वातावरणाशी सक्रियपणे जुळवून घेतात आणि आरामदायी सजावटीची निर्मिती करून इमारतीचा उर्जा वापर कमी करतात.
निवासी इमारतींमध्ये अल्युमिनियम आणि यूपीव्हीसी (अनप्लॅस्टिसाइज्ड पॉलीव्हिनियल क्लोराइड) एकत्रितपणे वापरले जाऊ शकतात आणि बजेटनुसार त्यांचा वापर करता येऊ शकतो. लांब आणि उंच सिस्टीम्ससाठी अल्युमिनियम योग्य असून युपीव्हीसीमुळे गोंगाट आणि थर्मल प्रॉपर्टीज कमी होतात. उच्चभ्रू निवासी अल्युमिनियम उत्पादनांमध्ये स्लायडिंग विंडो, टिल्ट आणि टर्न विंडो, व्हेंटिलेटर्स, फिक्स्ड विंडो, व्हिला विंडो आणि केसमेंट विंडो लोकप्रिय आहेत. उच्चभ्रू निवासी युपीव्हीसी उत्पादनांमध्ये केसमेंट विंडोज, स्लायडिंग विंडोज, स्पेशल विंडोज आणि कलर्ड विंडोज साजेसे रंगीत हँडल्स आणि इतर हार्डवेयर्ससह आर्किटेक्चरल डिझाइनमध्ये उपलब्ध होतात.
उजळ आणि आकर्षक दर्शनी बाजूसाठी सखोल विचार व इंजिनियरिंगची गरज असते. त्यात डिझाइनपासून साहित्याची निवड, कंत्राटदाराची निवड आणि इन्स्टॉलेशन यांचा समावेश होतो. त्याशिवाय योग्य बांधणीच्या दर्शनी बाजूमुळे नैसर्गिक प्रकाश वाढतो तसेच इमारतीमध्ये हवा खेळती राहाते. दर्शनी बाजूचा मजबूतपणा आणि टिकाऊपणा जोरदार वाहणारं वारं तसेच पावसापासून इमारतीचं रक्षण करतं. दर्शनी बाजू उभारण्याचा आणखी एक प्रमुख फायदा म्हणजे ध्वनी प्रदूषण कमी होण्यास मदत होते. याच कारणामुळे आजकाल जास्तीत जास्त निवासी इमारती वेगळी दर्शनी बाजू उभारण्यास पसंती देत आहेत.
तंत्रज्ञानात वेगाने सुधारणा होत असून उर्जेची बचत करणाऱ्या साहित्याची निर्मिती झाली आहे, कारण ही आधुनिक उत्पादने ताकदवान सौर उर्जा शोषक आहेत. साहजिकच वीज निर्मितीसाठी पर्यायी स्त्रोत म्हणून निवासी आणि व्यावसायिक इमारतींमध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्याशिवाय फसाद इंजिनियर्स बिल्डिंग इनफर्मेशन मॉडेलिंगमधील (बीआयएम) प्रत्यक्ष आणि कार्यात्मक इमारतीच्या आराखड्याच्या विश्लेषणासाठी फिनाइट एलिमेंट अनालिसिस (एफईए) आणि सिम्युलेशन वापरून दर्शनी बाजूचे घटक डिझाइन करतात. अशा प्रकारचे तंत्रज्ञान आणि विकासाला आघाडीचे स्थान देत, शाश्वत इमारतींची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी मोठ्या व्यावसायिक प्रकल्पांमध्ये तसेच छोट्या आणि स्वतंत्र घर मालकांकडून दर्शनी बाजू सजावटीचा कल आणखी वाढणार आहे.