दिल्ली- देशात लोकसभा निवडणुका झाल्यानंतर 18 व्या संसदेचे कामकाज सुरू झाले. दोन दिवस लोकसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचे शपथ ग्रहण झाल्यानंतर आजपासून सरकारची खरी परीक्षा सुरू होणार आहे. यासाठी लोकसभा आणि राज्यसभा ही संसदेची दोन्ही सभागृहे सज्ज आहेत. आज ‘नीट’ परीक्षेतील घोटाळा, अग्निपथ योजना आणि महागाई अशा अनेक मुद्यांवर सरकार आणि विरोधकांमध्ये खडाजंगीची शक्यता आहे.https://sindhudurgsamachar.in/देश-विदेश-आता-cbce-परीक्षा-वर्/
पेपर लीक प्रकरणाव्यतिरिक्त विरोधक बेरोजगारीचा मुद्दाही उपस्थित करू शकतात. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर सोमवारी लोकसभेत चर्चा होणार आहे. लोकसभेतील भाजपाचे सदस्य आणि माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू करणार आहेत. भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी स्वराज यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे.
लोकसभेने धन्यवाद प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी 16 तासांचा अवधी दिला आहे, जो मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उत्तराने संपेल. राज्यसभेतील चर्चेसाठी 21 तासांचा कालावधी निश्चित करण्यात आला असून, बुधवारी पंतप्रधान उत्तर देऊ शकतात. ‘नीट’च्या मुद्यावरून संसदेत गदारोळ सुरू आहे. वास्तविक, एनटीएने 5 मे रोजी नीट-यूजी परीक्षा घेतली होती. 24 लाख उमेदवारांनी परीक्षा दिली. 4 जून रोजी निकाल जाहीर झाला. मात्र निकाल लागताच विद्यार्थ्यांसह विरोधकांनी प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप करीत सरकार विरोधात गोंधळ घातला होता.
..