देश-विदेश: पश्चिम बंगालाच्या मुख्यमंत्री ममता बैनर्जींची प्रकृती स्थिर

0
38
पश्चिम बंगालाच्या मुख्यमंत्री ममता बैनर्जींची
पश्चिम बंगालाच्या मुख्यमंत्री ममता बैनर्जींची प्रकृती स्थिर

कोलकाता: पश्चिम बंगालाच्या मुख्यमंत्री ममता बैनर्जींच्या घरात त्यांच्या डोक्याला गंभीर दुःखापत झाली आहे. त्यांना काल रुग्णालयात दाखल केले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले. “मुख्यमंत्र्यांची प्रकृती स्थिर आहे. वरिष्ठ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्या होत्या. आज सकाळी त्यांची पुन्हा तपासणी करण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/kokan-गिम्हवणे-केंद्रशाळेत-नि/

कालीघाट परिसरातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाभोवती सुरक्षा व्यवस्था वाढवली,” असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ममता बैनर्जींना धक्का लागल्याने त्यांना पडल्या, असे पोलिस अधिकाऱ्यांनी ‘एसएसकेएम’ रुग्णालयाच्या अहवालाचा संदर्भ देत सांगितले. मात्र या संदर्भात मुख्यमंत्र्यांचे निवेदन घेण्याबाबत किंवा या संदर्भात तक्रार नोंदविण्याबाबत भाष्य करण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ममता बैनर्जींच्या तब्येतीची विचारपूस करून ‘लवकर बऱ्या व्हा,’ अशी पोस्ट ‘एक्स’ वर केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here