देश-विदेश: महानगरांच्या तुलनेत छोट्या शहरांतील  इलेक्ट्रिक स्कूटर्सचा दैनंदिन सरासरी प्रवास जास्त

0
37
महानगरांच्या तुलनेत छोट्या शहरांतील  इलेक्ट्रिक स्कूटर्सचा दैनंदिन सरासरी प्रवास जास्त

–          नागरकाइल, कटक, मलप्पुरम, कोझीकोड आणि भुवनेश्वर अशा शहरांतील एथर चालकेतर्फे रोज किमान ४० किमीची नोंद

–          ६२,२७ दशलक्ष ट्रिप्ससह बेंगळुरू आघाडीवर, एकूण २१८.५ दशलक्ष किमीसह प्रती स्कूटर सरासरी ५३८७ किलोमीटरचे अंतर पार

–          एथर ग्रिड हे वेगवान चार्जिंग नेटवर्क प्रमुख शहरांत प्रत्येक ६ ते १५ चौरस फुटांवर आपली व्याप्ती विस्तारणार

–          २०२३ मध्ये एथरतर्फे १,११,४१० युनिट्सची विक्री, वार्षिक पातळीवर ८८ टक्के वाढ

बेंगळुरू जानेवारी २०२४ – एथर एनर्जी या भारतातील आघाडीच्या इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपनीने एथर २०२३ अहवाल लाँच केला असून त्यात लक्षणीय ट्रेंड्स आणि कामगिरी नोंदवण्यात आली आहे. वर्ष २०२३ मध्ये १,९८,४९६ एथर स्कूटर्सनी तब्बल १.२ अब्ज किलोमीटर्सचे अंतर पार करत गेल्या वर्षाच्या तुलनेत २०९ टक्के वाढ नोंदवली. हा वाढ प्रामुख्याने लहान शहरे व गावांत दिसून आली असून तिथे एथर स्कूटर्स वेगाने लोकप्रिय होत आहेत.

दैनंदिन प्रवासाच्या बाबतीत नागरकाइल, कटक, मलप्पुरम, कोझीकोड आणि भुवनेश्वर अशा शहरांनी राष्ट्रीय सरासरी मागे टाकत दररोज सरासरी ४० किमी प्रवासाची नोंद केली असून ते बहुतेक एथर चालकांनी नोंदवलेल्या २६ किमीपेक्षा जास्त आहे. बेंगळुरू आणि चेन्नई एकूण अंतराच्या बाबतीत आघाडीवर आहेत. चेन्नई १४,८३५ स्कूटर्ससह पार केलेल्या ८६.८ दशलक्ष किलोमीटर्ससह आघाडीवर असून प्रत्येक गाडीची सरासरी ५८५४ किमी आहे. तेलंगणा, पुणे आणि दिल्ली यांचाही पहिल्या पाच शहरांमध्ये समावेश असून तिथे अनुक्रमे ६९.७ दशलक्ष किमी, ६८.४ दशलक्ष किमी आणि ५३ दशलक्ष किमी नोंदवण्यात आले आहेत. महाराष्ट्रात २०२३ मध्ये एकूण १७८.९ दशलक्ष किलोमीटर्सची नोंद झाली असून प्रती स्कूटर ५२०० किलोमीटर्सचे सरासरी अंतर नोंदवण्यात आले आहे.

एथर चालक सातत्याने लांब पल्ल्याच्या प्रवासाला जात असून एकूण ६०,००० स्कूटर्सनी २०२३ मध्ये किमान एकदा १०० किलोमीटर्सपेक्षा जास्त प्रवास केला आहे. एका रायडरने उल्लेखनीय कामगिरी नोंदवली असून त्यात त्यांनी एकाच चार्जमध्ये १०० किमी अंतर पार करत अशा ६२ ट्रिप्स पूर्ण केल्या आहेत. यावरून एथर स्कूटरची असामान्य क्षमता लक्षात येते.

सुविधांच्या वापराची पद्धत

एथरचा वार्प मोड २०२० पासून लोकप्रिय असून २०२३ मध्ये युजर्सनी वार्प मोडमध्ये ११५ दशलक्ष किमीची नोंद केली. वार्प मोड सर्वाधिक प्रमाणात वापरणाऱ्या शहरांमध्ये तुमाकुरू (कर्नाटक), करीमनगर (तेलंगणा), कोट्टायाम आणि मलप्पुरम (केरळ) आणि नागरकाइल (तमिळ नाडू) यांचा समावेश आहे. या शहरांतील एथर चालक त्यांच्या एकूण राइडपैकी २० क्के वेळेस वार्प मोड वापरतात. यावरून या सुविधेची लोकप्रियता लक्षात येते. पार्क असिस्ट किंवा रिव्हर्स असिस्ट सुविधेच्या मदतीने पार्किंग करताना योग्य मार्गदर्शन मिळते. ही सुविधा वापरून पार करण्यात आलेले अंतर पृथ्वीच्या घेराच्या चारपट किंवा ,६२,००० किलोमीटर्स आहे. ऑन बोर्ड नॅव्हिगेशन एथर युजर्समध्ये लोकप्रिय झाले असून ही सुविधा वापरून २०६ दशलक्ष किलोमीटर्स नॅव्हिगेशन करण्यात आले आहे.

एथरची चार्जिंग यंत्रमा

एथर ग्रिड या एथर एनर्जीच्या वेगवान- चार्जिंग नेटर्वकने आपली व्याप्ती वाढवली आहे. चेन्नईबेंगळुरूपुणेमुंबईहैद्राबाद आणि दिल्ली एनसीआर अशा शहरांमध्ये प्रत्येक ६ ते १५ किलोमीटर अंतरावर चार्जिंग स्टेशन्स बसवण्यात आली आहेत.

२०२३ मध्ये एथरने देशभरात ९०० एथर ग्रिड्स बसवली असून फास्ट चार्जर्सची एकूण संख्या १६००+ फास्ट चार्जिंग पॉइंट्सवर गेली आहे. या कालावधीत एथर ग्रिड्स धोरणात्मक ठिकाणी बसवण्यात आली आहेत, ज्यामुळे ग्राहकांना बेंगळुरू ते नंदी हिल्स, पुणे ते लोणावळा, मुंबई ते अलीबाग, चेन्नई ते पाँडिचेरी, दिल्ली ते आग्रा, सिलिगुडी ते दार्जिलिंग आणि इतर अशा ठिकाणी सहजपणे जाता येईल. एथर ग्रिड्समुळे ग्राहकांना कन्याकुमारी ते कासारगौड (६४० किमी) असा पूर्ण किनारपट्टीचा प्रदेश दरम्यान बसवलेल्या ५२ वेगवान चार्जिंग स्टेशन्सच्या मदतीने सहजपणे पूर्ण करता येईल.

या विस्तारित ग्रिडमुळे रेंजची चिंता मोठ्या प्रमाणावर कमी झाली असून ते एथर चालकांनी केलेल्या असंख्य इंटरसिटी ट्रिप्सवरून सिद्ध झाले आहे. त्याशिवाय ४४७ एथर चालकांनी केरळमधील कोझीकोड ते मलप्पुरम आणि २३२ एथर चालकांनी चिकबल्लापूर ते बेंगळुरू अशा प्रवास करत एथरच्या नेटवर्कमुळे झालेल्या सोयीवर शिक्कामोर्तब केले आहे.

प्रवासाच्या पद्धतीमध्ये क्रांती आणण्यासाठी एथर एनर्जी बांधील आहे. प्रत्येक टप्प्याबरोबर एथर वेगवान, इलेक्ट्रिक भविष्याकडे जात असून कंपनीने भारतभरात इलेक्ट्रिक स्कूटर्सना पसंतीचा पर्याय म्हणून प्रस्थापित करण्याचे ध्येय ठेवले आहे. यावरून इलेक्ट्रिक वाहतूक क्षेत्राला आकार देण्यात महत्त्वाची आणि आघाडीची भूमिका बजावण्याची एथरची वचनबद्धता अधोरेखित झाली आहे.

About Ather Energy

Ather Energy, India’s first intelligent electric vehicle manufacturer was founded in 2013 by IIT Madras alumni, Tarun Mehta, and Swapnil Jain. Ather is backed by Hero MotoCorp, GIC, NIIF, Sachin Bansal, and Tiger Global. Ather launched India’s first truly intelligent electric scooter – The Ather 450 in 2018, followed by their flagship offering Ather 450X in 2020 and the Gen3 of the 450X in 2022. In August 2023, Ather launched the 450S and 2 variants of the 450X. Ather has also installed a comprehensive public charging network, Ather Grid, designed and built in India. With 1600+ charging points across 100+ cities, Ather Grid is the country’s largest fast-charging network for electric two-wheelers. With 86 Indian and international patent applications, 169 trademarks, and 150+ Indian and International design registrations to its name, Ather aims to provide consumers with the best possible ownership experience. Ather currently operates in 130+ cities including Bengaluru, Delhi, Chennai, Hyderabad, Pune, Jaipur, Kochi, Ahmedabad, Mumbai, Mysore, and Kolkata.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here