देश-विदेश: महिंद्रा लास्ट माइल मोबिलिटीने झहीराबादमध्ये त्यांच्या विद्युत वाहन (ईव्ही) उत्पादन सुविधेचा भूमीपूजन समारंभ आयोजित

2
190
महिंद्रा लास्ट माइल मोबिलिटीने झहीराबादमध्ये त्यांच्या विद्युत वाहन (ईव्ही) उत्पादन सुविधेचा भूमीपूजन समारंभ आयोजित
देश-विदेश: महिंद्रा लास्ट माइल मोबिलिटीने झहीराबादमध्ये त्यांच्या विद्युत वाहन (ईव्ही) उत्पादन सुविधेचा भूमीपूजन समारंभ आयोजित

विद्युत वाहन (ईव्ही) उत्पादन सुविधा तेलंगणा सरकारच्या विद्युत वाहन गुंतवणूक धोरणाच्या महाप्रकल्प श्रेणी अंतर्गत येते

तीन चाकी आणि चार चाकी विद्युत वाहन श्रेणीतील वाहनांचे भाग आणि वाहने तयार करणे

झहीराबाद,  एप्रिल, २०२३: महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) समूहाचा एक भाग असलेल्या महिंद्रा लास्ट माइल मोबिलिटीने (LMM) आज तेलंगणातील झहीराबाद येथील त्यांच्या विद्यमान प्लांटमध्ये नवीन उत्पादन युनिटचे भूमीपूजन समारंभ आयोजित केले. तेलंगणा सरकारचे नगर प्रशासन आणि नगर विकास मंत्री, उद्योग व वाणिज्य मंत्री आणि माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन मंत्री माननीय श्री. के. टी. रामा राव हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. झहीराबाद मतदार संघाचे आमदार श्री. के. माणिक राव आणि तेलंगणा सरकारच्या उद्योग व वाणिज्य आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव आयएएस श्री. जयेश रंजन हे देखील या प्रसंगी उपस्थित होते.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-नमो-आवास-योजनेअंतर्गत-10/

हे महिंद्रा अँड महिंद्राने फेब्रुवारी २०२३ मध्ये केलेल्या तेलंगणातील १००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या घोषणेच्या अनुषंगाने आहे. या नवीन सुविधेसह कंपनीचे उद्दिष्ट एक अत्याधुनिक बॅटरी असेंब्ली लाइन तयार करणे, पॉवर पॅक तयार करणे आणि तीन आणि चार चाकी विद्युत वाहनांसाठी इलेक्ट्रोनिक व ड्राइव्हट्रेन तयार करणे आहे. या सुविधेमुळे प्रदेशातील ८०० ते १००० कर्मचाऱ्यांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

तेलंगणा सरकारचे नगर प्रशासन आणि नगर विकास मंत्रीउद्योग व वाणिज्य मंत्री आणि माहिती तंत्रज्ञानइलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन मंत्री माननीय श्री. के. टी. रामा राव यावेळी म्हणाले, तेलंगणा सरकारच्या केंद्रस्थानी असलेल्या लक्ष्यांपैकी एक विद्युत वाहने (ईव्ही) हे आहे आणि आम्ही विद्युत वाहनांचा प्रचार करण्यासाठी आणि त्यांचा अधिकाधिक स्वीकार व्हावा यासाठी योग्य पायाभूत सुविधा आणि एक उत्तम परिसंस्था विकसित व्हावी म्हणून वचनबद्ध आहोत. या नवीन सुविधेमुळे केवळ तेलंगणातच नाही तर संपूर्ण भारतात विद्युत वाहनांचा (ईव्ही) प्रसार होण्यासाठी मदत होईल. महिंद्रा अँड महिंद्राचे या त्यांच्या नवीन सुविधेचे भूमीपूजन केल्याबद्दल अभिनंदन. मला खात्री आहे कीही सुविधा रोजगार निर्मिती करण्यासाठी  आणि उपजीविका टिकवून ठेवण्यासाठी भविष्यात खूप पुढे जाईलप्रगती करेल.

 महिंद्रा लास्ट माइल मोबिलिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सुमन मिश्रा म्हणाल्या, महिंद्रा लास्ट माइल मोबिलिटी (LMMभारताच्या तीन चाकी वाहनांच्या विद्युतीकरणाच्या प्रवासात आघाडीवर आहे. मी तेलंगणा सरकारच्या सक्रियतेसाठी आणि व्यवसाया करण्याच्यादृष्टीने  सुलभ धोरणांसाठी आभार मानू इच्छितेज्या अंतर्गत झहीराबादला चार मेगा ईव्ही उत्पादन क्लस्टरपैकी एक म्हणून विकसित केले गेले आहे. या सुविधेमुळे आम्हाला प्रदेशात उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध होतील.

 बाजारातील एक अग्रणी म्हणून, महिंद्रा लास्ट माइल मोबिलिटी (LMM) या श्रेणीचे विद्युतीकरण करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान देत आहे. शाश्वतता हे कंपनीसाठी केंद्रस्थानी असलेल्या प्रमुख क्षेत्रांपैकी एक आहे, आणि या नवीन युनिटची रचना कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी आणि कचरा कमी करण्यासाठी आणि त्याच बरोबर जास्तीत जास्त कार्यक्षम आणि उत्पादनाची उत्तम गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी केली गेली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा २०४० पर्यंत कार्बन तटस्थता मिळवण्यासाठी वचनबद्ध आहे.

2 COMMENTS

  1. […] मुंबई दि. २७ एप्रिल – सुदानमध्ये अडकलेल्या सांगली जिल्ह्यातील सुमारे शंभर नागरीकांच्या सुटकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील सरसावले असून या नागरिकांना परत आणण्यासाठी लक्ष देऊन योग्य पावले उचलण्याची मागणी परराष्ट्र मंत्र्यांकडे ट्वीटद्वारे केली आहे.http://sindhudurgsamachar.in/देश-विदेश-महिंद्रा-लास्ट/ […]

  2. […] महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत संगम प्रभागसंघ नेरूर देऊळवाडा यांच्या वतीने संगम प्रभागसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा व इतर कार्यक्रम आज सुखकर्ता हॉल नेरूर चव्हाटा येथे संपन्न झाले.या कार्यक्रमाचे उदघाटन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. ग्रामसंघ व सीआरपींचा सत्कार कऱण्यात आला. हळदी कुंकू समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. http://sindhudurgsamachar.in/देश-विदेश-महिंद्रा-लास्ट/ […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here