चेन्नई- माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी निर्दोष सुटका झालेल्या संथन याचे निधन झाले आहे. श्रीलंकेचे रहिवासी असलेला संथन उर्फ टी सुथेनथिराजचे आज (२८ फेब्रुवारी) रोजी निधन झाले आहे. चेन्नईच्या राजीव गांधी जनरल हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. https://sindhudurgsamachar.in/kokan-रोटरॅक्ट-क्लब-ऑफ-रायझिंग-2/
संथन उर्फ टी सुथेनथिराज याला राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. तसेच त्याला जन्मठेपेची शिक्षाही सुनावण्यात आली होती. या प्रकरणात एकूण ६ दोषी असल्याचे समजले होते. पुढे साल २०२२ मध्ये न्यायालयाने संथनची निर्दोष मुक्तता केली. त्यावेळी याबाबत त्याला घरी परतण्याचे आवाहन करणारे पत्रही लिहिले होते.
संथनची प्रकृती २७ जानेवारी रोजीच फार खालावली होती. त्याचे यकृत निकामी झाले होते. तसेच त्याला क्रिप्टोजेनिक सिरोसिसचा त्रास होतहोता. या आजारातून त्याला बरे करण्यासाठी डॉक्टरांनी शर्थिचे प्रयत्न केले.