महिंद्रा विद्यापीठाला हे जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे की, पुढील पाच वर्षात (आर्थिक वर्ष २५ ते आर्थिक वर्ष २९ पर्यंत) श्री. आनंद महिंद्रा आणि त्यांच्या कुटूंबाकडून महिंद्रा विद्यापीठाला रु. ५०० कोटी एवढे निधी देण्यात येणार आहे. श्री. महिंद्रा यांचा हा अत्यंत उदार निर्णय विद्यापीठासाठी निर्णायक ठरेल. महिंद्रा विद्यापीठ विस्तारत आहे, नवनवीन शाखा ते चालू करत आहेत. आंतरविद्याशाखीय शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी नेहमीच प्रयत्नशील असण्याच्या महिंद्रा विद्यापीठाच्या ध्येयाला चालना देण्यासाठी आणि सर्वसमावेशक आणि शाश्वत प्रगतीसाठी वचनबद्ध असलेल्या कुशल व्यक्तिमत्वांना प्रशिक्षित करण्यासाठी ही मदत उपयुक्त ठरेल.
याशिवाय, श्री. आनंद महिंद्रा यांनी इंदिरा महिंद्रा स्कूल ऑफ एज्युकेशनसाठी आर्थिक वर्ष २५ मध्ये रु.५० कोटी एवढी देणगी देणार असल्याचे जाहीर केले. इंदिरा महिंद्रा स्कूल ऑफ एज्युकेशन ही श्री आनंद महिंद्रा यांच्या आई सुश्री इंदिरा महिंद्रा यांच्या स्मरणार्थ असलेली शाळा असून शैक्षणिक संशोधन, अभ्यास आणि नवकल्पनांमध्ये उत्कृष्टतेचे केंद्र बनण्याचे या शाळेचे ध्येय आहे.
दोन्ही निधी मिळून श्री महिंद्रा एकूण रु.५५० कोटी एवढा निधी शैक्षणिक क्षेत्रासाठी देणार आहेत. महिंद्रा युनायटेड वर्ल्ड कॉलेज इंडिया आणि महिंद्रा इंटरनॅशनल स्कूल यांसारखे त्यांचे संपूर्ण भारतभर नेहमीच अनेक शैक्षणिक उपक्रम चालू असतात. याशिवाय, १९९६ मध्ये त्यांनी नन्ही कली हा कार्यक्रम सुरू केला,ज्याने गेल्या दोन दशकांमध्ये ७,००,००० पेक्षा जास्त वंचित मुलींना उच्च-दर्जाचे शिक्षण मिळवून दिले आहे.