देश-विदेश: सर्वांना मिळालेला ‘इमर्जन्सी अलर्ट’ तुम्हाला नाही मिळाला? ‘हे’ आहे कारण; त्वरीत बदला सेटिंग

0
10
'इमर्जन्सी अलर्ट'
सर्वांना मिळालेला 'इमर्जन्सी अलर्ट' तुम्हाला नाही मिळाला?'हे' आहे कारण;त्वरीत बदला सेटिंग

दिल्ली: आज सकाळी राज्यातील जवळपास सर्व स्मार्टफोनवर एक इमर्जन्सी अलर्ट पाठवण्यात आला होता. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने हा अलर्ट पाठवला होता. यामुळे बरेच लोक गोंधळून गेले होते.सोशल मीडियावर या नोटिफिकेशनचा स्क्रीनशॉट देखील व्हायरल झाला. https://sindhudurgsamachar.in/kokan-दक्ष-महिला-पोलिसांची-गुन/

⭐आणीबाणीच्या परिस्थितीत, किंवा एखाद्या मोठ्या आपत्तीवेळी सर्व नागरिकांना एकाच वेळी सूचना देता यावी, यासाठी सरकारने एक यंत्रणा तयार केली आहे. या नोटिफिकेशनच्या माध्यमातून त्याचीच चाचणी घेण्यात आली. मग ठराविक लोकांनाच हे नोटिफिकेशन मिळालं, आणि बाकीच्यांना नाही – असं का?

फोनमधील सेटिंग असू शकतं कारण

⭐तुम्हाला जर हा इमर्जन्सी अलर्ट आला नसेल, तर तुमच्या फोनमधील एक सेटिंग बंद आहे का हे तपासणं गरजेचं आहे. फोनमधील ‘Wireless Emergency Alerts’ ही सेटिंग बंद असल्यास, तुम्हाला भविष्यात देखील अशा प्रकारच्या धोक्याच्या सूचना मिळू शकणार नाहीत.

अशी बदला सेटिंग

इमर्जन्सी अलर्ट सेटिंग सुरू करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी फोनच्या सेटिंग्समध्ये जावं लागेल. त्यानंतर स्क्रोल डाऊन करून सेफ्टी अँड इमर्जन्सी हा पर्याय शोधा.यामध्ये गेल्यानंतर पुन्हा स्क्रोल डाऊन करून ‘Wireless Emergency Alerts’ हा पर्याय निवडा. याठिकाणी Allow Alerts हा पर्याय तुम्हाला बंद दिसेल. याच्या टॉगलवर टॅप करून हा पर्याय सुरू करा. यानंतर तुम्हाला वेळोवेळी इमर्जन्सी अलर्ट मिळतील.

अलर्ट फीचर अनिवार्य

केंद्र सरकारने यापूर्वीच मोबाईल कंपन्यांना आपल्या स्मार्टफोनमध्ये हे इमर्जन्सी अलर्ट फीचर देणं अनिवार्य केलं आहे. सरकारच्या आदेशानंतर देखील आपल्या फोनमध्ये इमर्जन्सी अलर्ट फीचर न देणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं एप्रिल महिन्यात सांगण्यात आलं होतं. यासाठी सरकारने कंपन्यांना सहा महिन्यांची मुदत दिली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here