देश-विदेश: CEAT टायर्स आणि IARC ने गोव्यात इंडियन नॅशनल ऑटोक्रॉस चॅम्पियनशिप २०२३ आणि टाइम अटॅक इव्हेंटची दुसरी फेरी यशस्वीरित्या केली पूर्ण

0
114
CEAT टायर्स आणि IARC ने गोव्यात इंडियन नॅशनल ऑटोक्रॉस चॅम्पियनशिप २०२३,टाइम अटॅक इव्हेंट
CEAT टायर्स आणि IARC ने गोव्यात इंडियन नॅशनल ऑटोक्रॉस चॅम्पियनशिप २०२३ आणि टाइम अटॅक इव्हेंटची दुसरी फेरी यशस्वीरित्या केली पूर्ण

मुंबई:CEAT लिमिटेड (CIN No: L25100M H1958PLC 011041)  आणि  इंडियन  ऑटोमोटिव्ह  रेसिंग  क्लब  (IARC)  यांनी २९ आणि ३० एप्रिल रोजी  गोव्यातील पोंडा येथील  फार्मागुडी मधील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित इंडियन नॅशनल ऑटोक्रॉस चॅम्पियनशिप २०२३ आणि टाइम अटॅक इव्हेंटची दुसरी फेरी यशस्वीरित्या पार पाडली. हाय-स्पीड रेसिंग आणि सहभागींच्या ड्रायव्हिंग कौशल्याची चाचणी घेणारी आव्हाने असलेला हा कार्यक्रम रोमांचकारी ठरला.https://sindhudurgsamachar.in/मनोरंजन-माझ्या-आई-वडिलां/

या कार्यक्रमाला केवळ गोव्यातीलच नव्हे तर मुंबई, पुणे, बंगळुरू, हैदराबाद आणि दिल्ली येथूनही मोटरस्पोर्ट प्रेमी आणि चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. प्रो-एक्सपर्ट, प्रो-अॅमटयूअर  आणि  अॅमटयूअर  अशा श्रेण्या होत्या.  यामध्ये प्रत्येक सहभागीने अतुलनीय ड्रायव्हिंग कौशल्ये दाखवली. त्यामुळे एक रोमांचक आणि अटीतटीची स्पर्धा झाली. गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या  मैदानाने या वेगवान कृती कार्यक्रमाला एक सुंदर पार्श्वभूमी प्रदान केली होती आणि प्रत्येक गटातील विजेत्यांना रोख पारितोषिक, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात आले.

याप्रसंगी बोलताना CEAT चे मुख्य विपणन अधिकारी लक्ष्मी नारायणन बी म्हणाले, “अशा यशस्वी कार्यक्रमाशी जोडले जाण्याबद्दल आम्हाला आनंद होत आहे. CEAT नावीन्यपूर्णतेला  चालना देण्यावर आणि व्यापक ऑटोमोटिव्ह उद्योगाच्या वाढीस हातभार लावण्यावर विश्वास ठेवते आणि रस्त्यावरील वेगवान आणि विविध आव्हानात्मक परिस्थितीत आमच्या टायर्सची उत्कृष्ट कामगिरी दाखवण्याची संधी या कार्यक्रमाने आम्हाला प्रदान केली. आम्ही सर्व विजेत्यांचे आणि सहभागींचे अभिनंदन करतो. भविष्यात अशा कार्यक्रमांचा भाग होण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

निकाल आणि वैशिष्ट्य यांसह या कार्यक्रमाबद्दल अधिक माहितीसाठी कृपया IARC वेबसाइटला www.iarcindia.com भेट द्या.

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here