अभिनेत्री कंगना रनोटचा ‘धाकड’ चित्रपट चांगलाच आपटला आहे. या चित्रपटासाठी १०० कोटी रुपये खर्च आला होता. या चित्रपटाचे अनेक शो रद्द करण्यात आले आहेत. चित्रपट सुपर फ्लॉप ठरल्याने आता त्याचे ओटीटी आणि सॅटेलाइट राइट्सही विकले जात नाहीयेत. हा चित्रपट 7 दिवसांत म्हणजेच पहिल्या आठवड्यात 5 कोटीही कमावू शकलेला नाही. झी 5 आणि झी सिनेमा या चित्रपटाचे ओटीटी आणि सॅटेलाइट हक्क विकत घेणार असल्याची चर्चा बाजारात होती.
हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट 20 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. कंगनाशिवाय या चित्रपटात अर्जुन रामपाल, दिव्या दत्ता आणि शाश्वत चॅटर्जी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात कंगना एजंट अग्नीच्या भूमिकेत आहे.


