सामाजिक तेढ निर्माण करणारे विधान केल्यामुळे नवनीत कौर राणा आणि रवी राणा यांना खार पोलिसांनी अटक करून रविवारी त्यांना वांद्रे कोर्टात हजर करण्यात आले.कोर्टाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आणि ती निगेटिव्ह आल्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली.रवी राणा यांची रवानगी आर्थर रोड तुरुंगामध्ये पाठविण्यात आले तर नवनीत कौर राणा यांना भायखळा तुरुंगात पाठविण्यात आले.याप्रकरणाची पुढील सुनावणी 29 एप्रिल रोजी होणार आहे.
नवनीत राणा आणि रवी राणा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर राणा दाम्पत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात अडथळा येऊ नये यासाठी आपले आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले होते. पण त्यानंतर चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी खार पोलिसांनी दोघांना अटक केली.
भायखळा तुरुंगामध्ये जाताच नवनीत कौर राणा यांची प्रकृती खालवल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर भायखळा तुरुंगातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत


