राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची न्यायालयीन कोठडी आज संपत होती ईडीने तब्बल साडेसात तासांच्या चौकशीनंतर 23 फेब्रुवारीला अटक केली होती.पण न्यायालयाने नवाब मलिक यांच्या कोठडीमध्ये वाढ केली आहे.नवाब मलिक यांच्या न्यायलयीन कोठडीमध्ये 4 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.
कमरेचा त्रास असल्यामुळे झोपण्यासाठी बेड उपलब्ध करून देण्यात यावा. चादर आणि बसण्यासाठी एक चेअर देण्यात यावी या मागण्यांचा अर्ज त्यांनी न्यायालयासमोर सादर केला होता.न्यायालयाने त्यांच्या या तिन्ही मागण्या मान्य केल्या आणि आर्थर रोड जेल प्रशासनाला सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.कुर्ल्यातील तब्बल तीन एकर जागा अवघ्या 30 लाखांत नवाब मलिक यांनी खरेदी केली. या खरेदीत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता.