नवी मुंबई महानगरपालिका आणि परिवहन उपक्रमामार्फत वाशी सेक्टर-12 येथे उभारण्यात आलेले प्रकल्प अनेक वर्षांपासून बंद

0
24

नवी मुंबई महानगरपालिका आणि परिवहन उपक्रमामार्फत वाशी सेक्टर-12 येथे उभारण्यात आलेले बस स्थानक, वाणिज्य संकुल, आंतरक्रीडा संकुल आणि बँक्वेट हॉल हे प्रकल्प अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत पडून आहेत.

नागरिकांच्या कररुपी करोडो रुपयांचा वापर करून उभारलेली ही सुविधा अद्याप सुरू न झाल्याने ती अक्षरशः धूळखात गेलेली आहे.या प्रकल्पांच्या विलंबामुळे अपेक्षित सार्वजनिक सेवा आणि सुविधा नागरिकांना मिळत नाहीत.

उलट, या रिकाम्या जागांमध्ये रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचाली व अनैतिक प्रकार वाढल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. परिणामी, परिसरातील सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

या सर्व प्रकल्पांना तातडीने गती देऊन ते नागरिकांच्या सेवेसाठी सुरू करण्याची मागणी भाजपाचे उपाध्यक्ष, प्रवक्ते आणि माजी नगरसेवक विक्रम (राजू) शिंदे यांनी केली आहे.

त्यांनी संबंधित विभागांनी दुर्लक्ष न करता या संकुलांचा योग्य वापर करून सार्वजनिक निधीचा सन्मानपूर्वक उपयोग करावा, अशी ठाम भूमिका मांडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here