प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर
सावंतवाडी- माझ्याकडे शिक्षणमंत्री पदाची जबाबदारी आल्यानंतर अनेकांनी या पदात ताकद नाही, असे म्हटले होते; मात्र शिक्षणातच खरी ताकद आहे, हे दाखवून द्यायचे आहे. या क्षेत्रात काम करण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत. त्यासाठी दूरदृष्टी ठेवणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने शैक्षणिक क्रांती करण्यासाठी निश्चितच काम करेन, असा विश्वास आमदार तथा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. शिक्षकांना अतिरिक्त जबाबदाऱ्यांतून मुक्त करण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.


