नांदणी (ता. शिरोळ) शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना मागील तीन महिन्यांपासून बंद !
कोल्हापूर : नांदणी (ता. शिरोळ) येथील शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना मागील तीन महिन्यांपासून बंद असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. शासकीय वेळेनुसार सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते सायं 5 अशी सेवा उपलब्ध असणे आवश्यक असतानाही, दररोज दवाखाना बंद असल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
हे पण वाचा -नांदणी (ता. शिरोळ) शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना मागील तीन महिन्यांपासून बंद !
आज तब्बल तीन महिन्यांनंतर डॉक्टर दवाखान्यात उपस्थित झाले. मात्र त्यांनी, “दवाखान्यात औषधेच उपलब्ध नाहीत. मी एकटाच सिस्टमशी झुंजतोय; कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक पशूवैद्यकीय अधिकारीही नोकरी सोडून गेले आहेत,” असे आश्चर्यकारक विधान केले.
हे पण वाचा ₹10 लाखांवरील कार खरेदीत 1% TCS परतावा; असे मिळवा तुमचे पैसे
शेतकऱ्यांचा संताप वाढला
आजारी जनावरांच्या उपचारांसाठी शेतकऱ्यांना गावोगावी भटकंती करावी लागत आहे.
-
शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना बंद असल्याने जनावरांची जीवितहानी होण्याची शक्यता वाढली आहे.
-
शेतकरी प्रश्न विचारत आहेत—
-
“सरकारी डॉक्टर रोज पगार घेतात, पण सेवा कुठे?”
-
“आमच्या आजारी जनावरांना दाखवायचे कुणाकडे?”
-
तात्काळ चौकशीची मागणी
स्थानिक रहिवाशांनी आणि शेतकरी संघटनांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी, सेवा पुनर्संचालन आणि संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या गंभीर निष्काळजीपणामुळे शेतकरी आणि पशुपालकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.
हे पण वाचा ₹10 लाखांपेक्षा अधिक किंमतीची कार खरेदी केली तर सरकारकडून आकारला जाणारा 1% TCS (Tax Collected at Source) प्रत्यक्षात ग्राहकाला परत मिळू शकतो.

