नितेश राणे यांची पदयात्रा उत्साहात पार ;भाजपचे जोरदार शक्तीप्रदर्शन;

0
5
नितेश राणे यांची पदयात्रा उत्साहात पार
नितेश राणे यांची पदयात्रा उत्साहात पार

नितेश राणे यांची पदयात्रा उत्साहात पार ; भाजपचे जोरदार शक्तीप्रदर्शन

कणकवली  –

नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे आणि भाजपचे प्रभागनिहाय उमेदवार तसेच शहरातील कार्यकर्त्यांनी आज मोठ्या उत्साहात भव्य शक्तीप्रदर्शन केले. शहरातील पटकीदेवी मंदिर परिसरातून पदयात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर ही रॅली मुख्य बाजारपेठ मार्गे पटवर्धन चौकात पोहोचली.

पदयात्रेदरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत वातावरण दणाणून टाकले.
“भारतीय जनता पार्टीचा विजय असो”, “भारत माता की जय”, “वंदे मातरम्”, “नितेश राणे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं”, तसेच
“समीर नलावडे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

या पदयात्रेदरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांनी मार्गातील नागरिकांशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली आणि निवडणुकीत भाजप उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

या रॅलीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे, माजी नगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि प्रभाग क्रमांक १७ मधील उमेदवार अबिद नाईक, तसेच माजी नगराध्यक्ष बंडू हर्णे, मनोज रावराणे, दिलीप तळेकर, मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री यांच्यासह भाजपचे सर्व उमेदवार, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here