नवी मुंबई महानगरपालिकेच्या माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक मायक्रोबायलॉजी लॅबचे लोकार्पण देखील मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पार पडले.
ही प्रयोगशाळा आदित्य बिर्ला फाउंडेशनच्या सीएसआर निधीतील ८० लाखांच्या सहकार्याने, प्राईड इंडिया संस्थेच्या सहयोगाने उभारण्यात आली.
लॅबचे महत्त्व – रोगास कारणीभूत जीवाणू, विषाणू, बुरशी, परजीवी यांची अचूक ओळख – संसर्गजन्य रोगांचे लवकर निदान – योग्य प्रतिजैविक उपचार देण्यास मदत – साथीच्या रोगांवर नियंत्रणासाठी अत्यंत महत्वाची – PGIMS मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक चाचण्या उपलब्ध
उपलब्ध चाचण्या – ब्लड, युरिन, स्पुटम, स्टूल व बॉडी फ्लुइड कल्चर + सेंसिटिविटी चाचण्या – फंगल कल्चर – कोविड आणि स्वाईन फ्लूसाठी RT-PCR- HIV, -HCV व HBsAg साठी ELISA – पस स्वॅब व इतर संक्रमण तपासणी
यावेळी मान्यवरांनी कॅन्सर रजिस्ट्री, तपासणी विभाग व केमोथेरपी वॉर्डची पाहणी केली. नवी मुंबईकरांसाठी गुणवत्तापूर्ण व आधुनिक आरोग्यसेवा देण्याच्या महानगरपालिकेच्या प्रयत्नांचे मंत्र्यांनी कौतुक केले.

