पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षात पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात होती. पंजाबमध्ये कॅप्टन यांच्या विरोधात 40 आमदारांनी नाराजी व्यक्त करणारे एक पत्र काँग्रेसच्या अध्यक्षांना पाठवले. त्याचाच विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. याच निमित्तीने चंदीगड येथे पंजाब काँग्रेस भवनात आमदारांची बैठक बोलावण्यात आली.त्यांनतर पंजाब मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला.
राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पक्षप्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर मोठा आरोप केला आहे. कॅप्टन म्हणाले की सिद्धू पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि लष्करप्रमुख जनरल बाजवा यांचे मित्र आहेत. जर काँग्रेस पक्षाने त्यांना पंजाबच्या मुख्यमंत्र्याचा चेहरा बनवले तर मी त्याला विरोध करेन, कारण हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे.
त्याशिवाय भविष्यातील राजकारणाबाबत माझ्याकडे अनेक पर्याय आहेत. मी 52 वर्षांपासून राजकारणात आहे. मी साडेनऊ वर्षे मुख्यमंत्री होतो. भाजपमध्ये सामील होण्याबाबत कॅप्टनने स्पष्ट उत्तर दिले नाही, पण त्यांनी कोणता नकारही दिला नाही. ते म्हणाले की अनेक लोक त्यांच्याशी जोडलेले आहेत. मी त्याच्यांशी बोलेल आणि मग भविष्याचा विचार करेन असेही ते म्हणाले.