पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप फ्रांसिस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान जलवायू परिवर्तन, गरिबी आणि जगासा उत्कृष्ट कसे बनवता येईल यावर चर्चा करण्यात आली. मोदी आणि पोप फ्रांसिस यांची फक्त 20 मिनिटे होणार बैठक 1 तास चालली. पोप यांच्या भेटीनंतर मोदी आता फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यासह आणखी 3 राष्ट्राध्यक्षांची भेट घेणार आहे.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांची आणि मोदी यांची भेट विशेष असल्याचे बोलले जात आहे. चीन हिंद आणि प्रशांत महासागरात बंडखोरी करू शकतो. त्यामुळे देखील या मुद्दयावर मोदी मॅक्रॉन यांच्यासोबत चर्चा करणार आहे.अमेरिका, ब्रिटेन आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये पाणबुडीवरून मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. त्याचा थेट परिणाम AUKUS वर पाहायला मिळाला होता. सध्या जो बायडन आणि मॅक्रॉन यांच्यातील शाब्दिक चकमक थांबली आहे. मात्र, या देशांमध्ये कोणत्याही प्रकारे मतभेद होऊ नयेत यासाठी मोदी प्रयत्न करतील.


