पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर असून ते वॉशिंग्टनमध्ये दाखल झाले आहेत .यावेळी सकाळपासून मुसळधार पाऊस असूनही असंख्य भारतीय पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी अमेरिकन अँड्र्यूज संयुक्त वायुसेना तळावर आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेत भारताचे राजदूत श्री तरनजीत सिंग संधू आणि अमेरिकेचे उपराज्यमंत्री व्यवस्थापन आणि संसाधने श्री टी. एच. ब्रायन मॅककेन यांनी स्वागत केले.
“माझ्या भेटीदरम्यान, मी अध्यक्ष बायडेन यांच्यासोबत भारत-अमेरिका व्यापक वैश्विक धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेईन आणि परस्पर हितसंबंधांच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करीन,” असे अमेरिकेला जाण्यापूर्वी मोदी यांनी सांगितले आहे
या भेटीदरम्यान, पंतप्रधान राष्ट्रपती जो बिडेन आणि कमला हॅरिस यांच्यासोबत पहिली बैठक घेणार आहेत, पहिल्यांदा वैयक्तिक क्वाड शिखर परिषदेत सहभागी होतील आणि न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या 76 व्या सत्राला संबोधित करतील.
पंतप्रधान मोदींचा पुढील तीन दिवसांचा अजेंडा असा आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन शुक्रवारी (24 सप्टेंबर, 2021) त्यांच्या पहिल्या द्विपक्षीय बैठकीसाठी व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींचे यजमानपद भूषवतील. नंतर बायडेन , मोदी, जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यासह पहिल्यांदा वैयक्तिकरित्या क्वाड लीडर्स शिखर परिषदेचे आयोजन करतील.