गोव्याच्या दोनपौला येथील वैंगुनीम समुद्रकिनाऱ्यावर शनिवारी हम्पबॅक डॉल्फिन मृतावस्थेत आढळून आला आहे.हा डॉल्फिन मासेमारीचे जाळे पोटात अडकल्यामुळे मरण पावलं असल्याचे आढळले आहे.
समुद्रकिनाऱ्याचा प्रवाळ संशोधन केंद्राचे अधिकारी डॉ.कळंबी आणि डॉ.गांगुली यांनी या डॉल्फिनच्या मृत्यूचे कारण शोधताना त्यांना डॉल्फिनच्या पोटात जाळ्याचा मोठा गोळा असल्याचे दिसून आले. त्याचबरोबर या जाळ्यामध्ये काही मासेही अडकले होते. मृत डॉल्फिनचे काही भाग हे पुढील तपासासाठी घेण्यात आले आहेत.
मृत डॉल्फिन नर असून त्याची लांबी २.४३ मी आणि ०.४५मी जाडीचा आहे.समुद्रकिनाऱ्यावर गस्त घालणारे दृष्टी लाइफगार्ड यांनी आतापर्यंत बऱ्याच ऑलिव्ह रिडले कासवांना आणि डॉल्फिनना वाचवण्यात आणि पुन्हा समुद्रात सोडण्यात नेहमीच पुढाकार घेत आहेत.