सिंधुदुर्ग :परवानगी न घेता चालू असलेले चित्रीकरण ग्रामस्थांनी पाडले बंद ; आंदुर्ले गावात पूर्ण प्राथमिक शाळा सावरीचे भरड येथे चित्रीकरण सुरू असताना ग्रामस्थ आक्रमक

0
40
दैनिक सिंधुदुर्ग समाचार

प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर

कुडाळ/ आंदुर्ले – कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले गावात पूर्ण प्राथमिक शाळा सावरीचे भरड येथे चित्रीकरण सुरू असताना ग्रामस्थांची आक्रमक भूमिका चित्रीकरण पाडले बंद दुसऱ्या गावचे नाव असलेले फलक आंदुर्ले गावाच्या प्राथमीक शाळेच्या आवारातील शाळेच्या बोर्ड वर चढवून कोणाचीही परवानगी न घेता चित्रीकरण सुरू होते त्याचवेळी ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच ग्रामस्थांनी सदर बॅनर शाळेच्या मुळ बोर्डवरील काडून देत गावचे नाव वापरून चित्रीकरण करा अन्यथा करू नका दुसऱ्या गावचे नाव वापरून आमच्या गावात चित्रीकरण नको आणि जर का दुसऱ्या गावचे नाव लावून चित्रीकरण करायचे असेलतर त्या गावात जाऊन करावे असे ठणकावून सांगण्यात आले.

गावातील सामाजिक कार्यकर्ते मिलिंद निर्गुण यांनी कुठल्याही गावचे नाव उज्वल होत असेल तर आम्हाला त्याचे दु:ख नाही स्वागतच आहे पण आमच्या गावात परवानगी शिवाय बोर्ड उतरवून चित्रीकरण करण करणे हे आम्हांला मान्य नाही गावचे वापरून चित्रीकरण करित असाल तर सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे सांगून रीतसर परवानगी घेऊन आंदुर्ले गावात आंदुर्ले गावाचे नाव वापरून चित्रीकरण करा असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here