पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी समाजाचे प्रबोधन करत ॲक्सिस बँक साजरा करत आहे जागतिक पर्यावरण दिन

0
160
ॲक्सिस बँक ,जागतिक पर्यावरण दिन
समाजाचे प्रबोधन करत ॲक्सिस बँक साजरा करत आहे जागतिक पर्यावरण दिन

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतातील खाजगी क्षेत्रातील अग्रगण्य बँकांपैकी एक ॲक्सिस बँकेने पर्यावरणाचे रक्षण आणि शाश्वततेला चालना देण्याची आपली  बांधिलकी जपत अनेकविध उपक्रमांचे आयोजन केले. समाजामध्ये पर्यावरणीय जाणीव आणि जबाबदारीची भावना निर्माण करण्यासाठी ॲक्सिस बँकेने विविध पर्यटन स्थळांवर ‘ओपन फॉर द प्लॅनेट क्लीन-ए-थॉन’ ही देशव्यापी स्वच्छता मोहीम आयोजित केली. तसेच रेसिडेन्शिअल वेल्फेअर असोसिएशन (RWAs), मॉल्स आणि क्लब येथे जागरूकता कार्यक्रम आणि कर्मचारी सहभाग उपक्रम राबविले.https://sindhudurgsamachar.in/kokan-महिला-भगिनींच्या-शेतमाल/

मुंबई, पुणे, वाराणसी, नवी दिल्ली, गुवाहाटी, बंगळुरू आणि हैदराबाद येथील २३ सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या पर्यटन स्थळांवर ५ ते १२ जून २०२४ या कालावधीत एक आठवडाभर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. बांद्रा कार्टर रोड, माहीम बीच, जापनीज गार्डन, कलंगुट बीच, वाराणसी घाट, काझीरंगा नॅशनल पार्क, फोर्ट कोची इत्यादी विविध शहरांमधील ऐतिहासिक वास्तू आणि प्रमुख स्थळांचे जतन, संरक्षण आणि जीर्णोद्धार करण्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी बँकेने स्वयंसेवी संस्थांसोबत सहयोग केला आहे. या मोहिमेत बँकेचे कर्मचारी, ग्राहक, स्थानिक समुदाय, पर्यावरण कार्यकर्ते, स्थानिक अधिकारी आणि स्वयंसेवकांचा सहभाग असेल. कार्यक्रमाची व्याप्ती वाढवण्यासाठी, बँक १८ निवासी कल्याण संघटना (RWA), ९ मॉल, २ क्लब आणि ५ सिनेमा हॉलसह ३४ निवडक ठिकाणी जनजागृती मोहीम राबवणार आहे. या उपक्रमाद्वारे, सहभागी सदस्य आभासी वातावरणात महत्वपूर्ण भारतीय स्मारके व्हर्च्युअली स्वच्छ करण्यासाठी गेममध्ये भाग घेऊ शकतील.

सहभागी सदस्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करताना ॲक्सिस बँकेच्या अध्यक्षा आणि ब्रांच बँकिंगच्या प्रमुख, अर्निका दीक्षित म्हणाल्या, “ॲक्सिस बँकेत काम करताना आम्हाला विश्वास आहे की प्रत्येक लहान कृती आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्यात मोठा बदल घडवून आणू शकते. या जागतिक पर्यावरण दिनी, आम्ही आमच्या कर्मचारी, ग्राहक आणि समाज घटकांना एक अर्थपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी एकत्र आणत आहोत. आम्ही केवळ आजूबाजूचा परिसर स्वच्छ करत आहोत असे नाही तर हरित भविष्यासाठी सामूहिक जबाबदारी आणि सकारात्मकता यांची भावनाही वाढीला लावत आहोत. आमच्या एकत्रित प्रयत्नांतून पुढच्या पिढीला भविष्याचे रक्षण करण्यासाठी आपल्या पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे महत्त्व देखील शिकवले जाईल.”

ॲक्सिस बँकेने आपल्या मुंबई कार्यालयातही काही उपक्रमांचे आयोजन केले आहे. खेळ, कोडी, शब्द शोध आव्हाने आणि प्रश्नमंजुषा या स्वरूपातील शैक्षणिक कार्यक्रम आणि स्वयंसेवी संस्थांच्या पर्यावरण पूरक वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री करण्यासाठी प्रदर्शन आयोजित केले. पर्यावरणाविषयी जागरुकता वाढवण्यासाठी, कर्मचाऱ्यांना अधिक शाश्वत भविष्यासाठी कार्य करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी या कार्यक्रमाची रचना करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी, जागतिक पर्यावरण दिनी, ॲक्सिस बँकेने ३७०० पेक्षा जास्त उत्साही सहभागी सदस्यांचा सहभाग नोंदविला होता. त्यांनी स्वयंसेवेने भारतातील १८ शहरांमधील २५ जलस्रोत स्वच्छ केले आणि त्यातून १२,७९४ किलो कचरा जमा झाला. “आठवडाभराच्या स्वच्छता मोहिमेदरम्यान जास्तीत जास्त जलकुंभांची स्वच्छता” आणि “एकाहून अधिक शहरांमधील जलसाठ्यांमधून जास्तीत जास्त किलोग्रॅम कचरा गोळा करण्यात आला” यासाठी या उल्लेखनीय प्रयत्नाला एशिया बुक ऑफ रेकॉर्डने मान्यता दिली.

जागतिक पर्यावरण दिन २०२४ साठीच्या ॲक्सिस बँकेच्या उपक्रमातून कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी आणि शाश्वत विकासासाठी सुरू असलेली बांधिलकी दिसून येते. या सर्वसमावेशक प्रयत्नांद्वारे, भावी पिढ्यांसाठी आपल्या वसुंधरेचे संरक्षण करण्याच्या जागतिक प्रयत्नांशी सुसंगत राहत ॲक्सिस बँक पर्यावरणीय शाश्वततेसाठी असलेली आपली बांधिलकी दृढ करते.

स्वच्छता मोहिमेचा भाग असणाऱ्या पर्यटन स्थळांची यादी 

उपक्रम स्थळाचे नावशहराचे नाव
बांद्रा कार्टर रोडमुंबई
माहीम चौपाटीमुंबई
डेक्कन नदी पात्रपुणे
कळंगुट बीचगोवा
इको पार्ककोलकाता
वाराणसी घाटवाराणसी
जापनीज गार्डननागपूर
ताजपूर बीचताजपूर
काझीरंगा राष्ट्रीय उद्यानगुवाहाटी
पुरी बीचपुरी
पत्रातू व्हॅली अँड डॅमरांची
माल रोडशिमला
कुतुबमिनारदिल्ली
अल्बर्ट हॉल संग्रहालयजयपूर
कैलासगिरी हिलवायजॅक
ऋषीकोंडा बीचवायजॅक
नंदी हिल्सबंगळुरू
सुलतान बथेरीमंगलोर
मालपे बीचउडिपी
गोलकंदा किल्लाहैद्राबाद
दुर्गम चेरुवू हैद्राबाद
फोर्ट कोचीएर्नाकुलम
चेराई बीचएर्नाकुलम

About Axis Bank:

Axis Bank is one of the largest private sector banks in India. Axis Bank offers the entire spectrum of services to customer segments covering Large and Mid-Corporates, SME, Agriculture, and Retail Businesses. With its 5,377 domestic branches (including extension counters) and 16,026 ATMs across the country as on 31st March 2024. The network of Axis Bank spreads across 2,963 centres, enabling the Bank to reach out to a large cross-section of customers with an array of products and services. The Axis Group includes Axis Mutual Fund, Axis Securities Ltd., Axis Finance, Axis Trustee, Axis Capital, A.TReDS Ltd., Freecharge, Axis Pension Fund and Axis Bank Foundation.

For further information on Axis Bank, please refer to the website: https://www.axisbank.com

For More Informations – Please contact

PR24x7 || Breakfastnews@pr24x7.com || 7803893363

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here