मुंबईकरांनो पाणी जपून वापरा;पवई वैतरणा पाणी पुरवठा लाईनला अचानक गळती

0
40

पवई येथील वैतरणा पाणी पुरवठा लाईनला अचानक गळती लागली आहे. दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईतील वरळी,नेपियन सी रोड,भुलाभाई देसाई मार्ग,दादर,माहीम,प्रभादेवी अशा अनेक भागांतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे देण्यात आली आहे.

जल जोडणीवर अकस्मात गळती उद्भवल्याने पाणीपुरवठा प्रभावीत झाला आहे. परिणामी जी दक्षिण, जी उत्तर, डी व ए या विभागातील दिनांक 12 व 13 नोव्हेंबर रोजीच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरु करण्यात आलं आहे. उद्या सकाळपर्यंत पाणीपुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता आहे. पाणी जपून व काळजीपूर्वक वापरण्याचं महापालिकेकडून आवाहन करण्यात आल आहे.

12-13 नोव्हेंबर दरम्यान 24 तासांच्या कालावधीसाठी (सकाळी 11 ते 11 पर्यंत पाणी पुरवठा विस्कळीत होईल. दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्यात आली आहेत. परंतु मलबार हिल, वरळी आणि पाली जलाशय आणि माहीम येथून थेट पाणी पुरवठा उद्यापर्यंत होऊ शकणार नाही. गळती दुरुस्तीच्या कामामुळे, 13 नोव्हेंबरलाही वरील भागात कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरा, असे आवाहन बीएमसीने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here