पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी सायंकाळी मुंबईत दाखल होणार आहेत.त्या तीन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्या आहेत.मंगळवारी सायंकाळी मुंबईत दाखल झाल्यानंतर सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत .
पुढील वर्षी एप्रिल महिन्यात बंगालमध्ये जागतिक व्यापार परिषद भरविण्यात येणार येणार आहे .त्या परिषदेत अधिकाधिक उद्योजकांनी सहभागी व्हावे, यासाठी ममता बॅनर्जी प्रयत्न करणार असून बुधवार दिनांक 1 डिसेंबर रोजी मुंबईतील उद्योग जगतातील मान्यवरांशी त्या चर्चा करणार आहेत.
तसेच त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार आहेत अशी माहिती अधिकृत रित्या मिळाली आहे. या दौऱ्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नाच्या स्वागत सोहळ्यालाही त्या उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर रात्री उशिरा मुख्यमंत्री ठाकरे यांना भेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे