सातारा- राज्यातील पश्र्चिम महाराष्ट्र आणि कोकण या दोन विभागात पर्यटनासाठी मोठा वाव आहे. त्यामुळे हे दोन्ही विभाग जोडण्यासाठी सुमारे ४५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. महाबळेश्वर येथील राजभवन मध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
सर्वांच्या टीकांना कामाने उत्तर देणार
राज्यामध्ये सध्या अनेक जण एकमेकांवर टीका करत आहेत. मात्र मी कोणावरही टीका करणार नाही तर सर्वांच्या ठिकाणांना कामाने उत्तर देईल अशा प्रकारचा अर्थविश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.


